मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणून किरण माने यांच्याकडे पाहिले जाते. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे किरण माने पुन्हा प्रसिद्धीझोतात आले. तल्लख बुद्धीच्या जोरावर किरण मानेंनी टॉप ३ मध्ये स्थान मिळवले. नुकतंच किरण मानेंनी त्यांच्या मावशीसाठी खास पोस्ट केली आहे.

किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी मावशीबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबर त्यांनी तिच्या काही गोड आठवणीही सांगितल्या आहेत.
आणखी वाचा : “सर्वांची नजर माझ्यावर” शशांक केतकरच्या ‘त्या’ फोटोवर पत्नीची कमेंट, म्हणाली “आणि तुझी…”

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”

किरण माने यांची पोस्ट

“…माझी फलटनची सुलामावशी ! ल्हानपनीपास्नं मी लै लाडका तिचा…अजूनबी कुठल्या लग्नसमारंभात आली की, “माझा किरन्या कुठंय..माझा किरन्या कुठंय.” करत शोधत येती… ल्हानपनी सुट्टीत मी फलटनला गेलो की म्हैना-म्हैनाभर तिच्याकडंच असायचो… आबा आनि मावशीचं मला कुठं ठिवू आन् कुठं नको असं हुयाचं… मुलखाचं लाड करून घेतलं मी मावशीच्या राज्यात.

…माझ्या मावशीनं आयुष्यातले लै भयान चढउतार पचवलेत भावांनो. तरूणपणी टोकाचं वैभव आनि ऐश्वर्य अनुभवलं आणि पोरं मोठी होता-होता जीवघेनी गरीबी, अपार दु:ख, भयान संकटांचाबी सामना केला. पन कुठल्याही क्षनी मावशी मला हतबल – निराश दिसली नाय.. येईल त्या परीस्थितीला हिमतीनं आनि हसतमुखानं तोंड दिलं… लै खमकी आनि जबराट हाय माझी मावशी ! माझ्यावर तिचीच सावली हाय… आज मावशीला पुन्हा सगळं ऐश्वर्य लाभलंय.. परिस्थिती बदलत र्‍हायली पन माझी मावशी नाय बदलली.. जश्शी पूर्वी होती तश्शीच अजूनबी हाय.. नादखुळा !

…या दोन वर्षांत दोन वेळा नातींच्या लग्नात भेटली. दोन्ही वेळा आधीच फोन आलावता.. “किरन्या..येनार हायेस ना लग्नाला? शुटिंग फिटींगची कारनं सांगीतलीस तर बघच. किती दिस झालं भेटला न्हाईस. आठवन येती का न्हाय मावशीची. का इसारलास?” मी म्हन्ल, “येनारय गं. तुला भेटायसाठीच तर सुट्टी काढली..”

..भेटल्यावर मिठी मारुन, तोंडावरनं मायेनं हात फिरवत, कानशीलावर बोटं मोडत म्हन्ली, “रोज टी.व्ही.त बघती तुला.. नातींना सांगती ए पोरींनो मला किरन्याचा पोग्राम लावून द्या.. त्या लावत्यात मग. फलटनमधल्या वळखीच्या बायका म्हन्त्यात ‘त्यो बिगबाॅसमधला किरन माने तुमचा पावना हाय व्हय? आधी एका मालिकेत इलास पाटील झाल्याला?’ मी म्हन्ती, ‘आवो पोरगा हाय माझा.’ त्यास्नी खरंच वाटत नाय. आज फोटू काढ आपला म्हंजी दाखवीन सगळ्यांना..”

फोटो काढताना हळूच मला म्हन्ली, “मला वाटायचं पोरगं वाया गेलं नाटकाच्या नादानं.. आता काय हाताला लागत नाय.. लै काळजी वाटायची तुझी.. पन आज तुझं नांव झालेलं बघून जीवाला बरं वाटतं. अजून लै मोठ्ठा हो. कष्टाला कमी पडू नकोस. कुनी तुझ्या पोटावर पाय आनला तरी त्याचं वाईट चिंतू नकोस. तुझ्या बापासारखा निर्मळ मनाचा र्‍हा. हरीबुवा तुला काय बी कमी पडू देनार नाय. माझ्या अर्ध्या गवर्‍या गेल्या मसनात. आता हितनं फुडचं तुझं यश बघायला मी र्‍हाती का नाय कुनाला ठावं..”… मला कसंतरीच झालं. डोळ्यातलं पानी लपवत हसत म्हन्लो, “मावशे, काय धाड भरनाय नाय तुला. लै जगनार हायस तू..” मावशी कसंनुसं हसली.. माझ्या काळजात उगीचंच कालवाकालव झाली..

‘मावशी’ ही गोष्टच नादखुळा निर्मान केलीय निसर्गानं गड्याहो ! लब्यू मावशे. लै लै लै जग. आनंदात रहा. तुला अभिमान वाटंल असंच काम करंल तुझा किरन्या…”, असे किरण माने यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “…मग माझ्याच बाबतीत असं का घडावे”, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “या जन्मी नातेवाईक…”

दरम्यान किरण माने यांच्या या पोस्टवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहे. अनेकांनी त्यांच्या मावशीला उदंड आयुष्य लाभो, अशी प्रार्थना केली आहे. तर अनेकांनी त्यांच्या या पोस्टचे कौतुक केले आहे.