मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या लेकीसाठी खास पोस्ट केली होती. त्यानंतर आता त्यांनी अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे.

‘बिग बॉस मराठी’मधून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणून किरण मानेंना ओळखले जाते. ते नेहमी विविध गोष्टींबद्दल व्यक्त होताना दिसतात. नुकतंच त्यांनी वंदना गुप्तेंबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तसेच एक लांबलचक पोस्टही केली आहे.
आणखी वाचा : “माझा प्रयोग होता अन्…” वंदना गुप्तेंनी पृथ्वीराज चव्हाणांच्या ताफ्यात घुसवलेली गाडी; म्हणाल्या “त्यांचे सुरक्षारक्षक…”

bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”
savlyachi janu savali fame megha dhade gift to veena jagtap
Video: ‘सावळ्याची जणू सावली’मधील वीणा जगतापला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने दिलं सुंदर गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझी मोठी समस्या…”

किरण मानेंची पोस्ट

“…काॅलेजमध्ये असताना जिचा मी ‘फॅन’ होतो.. जिच्यावर अक्षरश: ‘क्रश’ होता.. जिच्या आवाजाचा मी दिवाना होतो.. पुढं जाऊन त्याच अभिनेत्रीचा मी हिरो म्हणून प्रमुख भुमिका मला करणारंय, असं कुणी सांगीतलं असतं, तर मी त्याला येड्यात काढलं असतं !

रिहर्सल करताना स्वत:वर विश्वासच बसत नव्हता…’चारचौघी’मधल्या तिच्या ‘फोन सीन’साठी कितीतरी वेळा ते नाटक पाहिलंवतं मी. ज्याचा त्याचा प्रश्न-संध्याछाया-सेलिब्रेशन.. प्रत्येक नाटक फक्त तिच्यासाठी पाहिलं.. ‘कट टू’ – तिच्या शेजारी उभा राहून मी लव्ह सीन करत होतो, गाणी म्हणत होतो. आईशप्पत ! विश्वासच बसत नव्हता स्वत:वर…

…बारा वर्षांपुर्वीची ही गोष्ट ! सातार्‍यात घरी होतो. फोन वाजला. स्क्रीनवर नांव आलं ‘प्रशांत दामले’. “किरण, मी ‘श्री तशी सौ’ नाटक पुनरुज्जीवीत करतोय. तू काम करशील का? सोबत वंदना गुप्ते आहे.” पुर्वी मोहन जोशी,गिरीश ओक आणि वंदना गुप्तेंनी हे नाटक केलेले मी पाहिलंवतं. मला वाटलं मी मोहन जोशींनी साकारलेला सुत्रधार करणार. ‘श्री-सौ’ जोडगोळी प्रशांत-वंदना असणार असं वाटलं.

जेव्हा मला समजलं की मला ‘श्री’ च्या भुमिकेसाठी विचारलं गेलंय आणि माझ्या ‘सौ’ असणार आहेत वंदना गुप्ते.. तेव्हा मी उडालोच ! सुत्रधाराची भुमिका करणार होते प्रशांत दामले… सोबत होते अक्षय पेंडसे आणि अक्षता बिवलकर… नाटक म्हणजे धुमाकुळ होता नुस्ता… फुल्ल ऑन काॅमेडी. धमाल गाणी-भन्नाट डान्स… राडा-धिंगाणा-दणका होता.. तालमीतच लै मज्जा आली.

पहिला प्रयोग सुरू होताना कधी नव्हे ते लै लै लै टेन्शन आलंवतं. वंदना गुप्तेंचा हिरो म्हणून मला स्विकारतील का लोक?? सगळं फसलं तर??? बेक्कार हालत झालीवती… पण पहिला प्रयोगच दणक्यात पार पडला. या नाटकाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं…’सुपरस्टार’ प्रशांत दामलेंचा रंगभूमीवरचा करीश्मा जवळनं अनुभवला. इथंच नाय, तर इंग्लंड मध्ये लंडन-हाॅन्सलो-इलफर्ड-बर्मिंगहॅम पासून थेट स्काॅटलंड पर्यंत या नाटकाचे अनेक प्रयोग जबराट वाजले… हाऊसफुल्ल झाले !

काल ३१ जुलैला या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला तब्बल बारा वर्ष झाली… फेसबुकनं अलगद वर काढली, एक तपापूर्वीची गोड स्वप्न अनपेक्षितपणे सत्यात उतरवणारी ही हवीहवीशी आठवण !”, असे किरण माने यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “मंगळागौर म्हणजे काय?” वंदना गुप्ते म्हणाल्या, “लग्न आणि हनिमूननंतर…”

दरम्यान वंदना गुप्ते या सध्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्या शशी हे पात्र साकारत आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक केलं जात आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे.