बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ‘जवान’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अ‍ॅटलीने सांभाळली आहे. अवघ्या दोन दिवसांमध्येच किंग खानच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०२.७३ कोटींची कमाई केली आहे. तब्बल ४ वर्षांनी कमबॅक केल्यावर शाहरुख खानचे ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेते किरण माने यांनी किंग खानसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी शाहरुख आणि त्याच्या ‘जवान’चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे.

हेही वाचा : “अजून एक स्वप्न पूर्ण…”, ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचा नव्या घरात गृहप्रवेश, अनोख्या नेमप्लेटने वेधलं लक्ष

salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”

किरण माने यांची पोस्ट

आग्गाग्ग्गगागा… एक लाखाच्या वर लाईक्स… पाचशेच्या वर कमेन्टस्… दोन हजाराच्यावर शेअर्स… आणि तब्बल एक मिलीयन, म्हणजे दहा लाखाच्या वर व्हियूज ! अजूनबी सुरुच आहे. ते ही माझ्या फेसबुक पोस्टवर !! इन्स्टा-युट्यूबवर नव्हे. नादखुळाच !!!

…आजपर्यन्त माझ्या कुठल्याही पोस्टचे लाईक्स मी मोजले नाहीत. हो, पण कोण लाईक करतंय आणि कमेन्टस् काय येताहेत हे मात्र आवर्जुन पहातो, यातून समविचारी लोक कळतात, जवळ येतात. विषारी घाण दूर जाते. नको असलेला कचरा बाहेर जाऊन महाराष्ट्रभरात माझा मित्रमेळा पसरला तो यामुळेच… चाहते, प्रेम करणारी माणसं माझ्याशी संवाद साधू लागली. आयुष्य बहरून गेलं. काही जणांच्या दृष्टीनं हे ‘आभासी जग’ असो, मला मात्र यातून जिवंत, रसरशीत, हाडामासांचा, जीवाला जीव देणारा गोतावळा लाभला. माझ्यावर वाईट वेळ आली होती, तेव्हा अख्ख्या सोशल मिडीयानं आवाज उठवून भल्याभल्यांची हवा टाईट केलीवती, ती उगाच नाय.

कालपासून मात्र माझ्या फेसबुक अकाऊंटवर छप्परतोड, आजपर्यन्तचा रेकॉर्डब्रेक कहर झालाय ! मी ‘जवान’च्या स्क्रीनिंगच्या वेळचा एक व्हिडीओ शेअर केला, त्याला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे, देशभरातून नव्हे, आशियातून नव्हे, तर जगभरातून प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. श्रीलंका, बांग्लादेश, इंडोनेशिया, मलेशिया, पाकिस्तान, नेपाळ, साऊथ कोरीया, दुबई, म्यानमार, सौदी अरेबीया, इंग्लंड, अमेरीका, बल्गेरीया वगैरे वगैरे देशांमधले लोक माझ्या पोस्टवर आले. वर आकडे दिलेले आहेत. ते वाढतच चाल्लेत, ‘जवान’च्या करीश्म्यासारखे.

शारख्या, भावा तुझा स्पर्श ह्यो परीसाचा स्पर्श हाय… साध्या गोष्टीचबी सोनं करतोस तू… ‘सिनेमा इंडीया’ जगभरात लखलखतोय, झळाळतोय तुझ्या मिडास टच मुळं ! रूंब रूंब रूंब नांद्री… आणि लब्यू लैच

किरण माने.

हेही वाचा : अतुल कुलकर्णी : भूमिका घेणारा, सामाजिक कामात योगदान देणारा कलावंत

दरम्यान, ‘जवान’ चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथ सुपरस्टार्सची तगडी स्टारकास्ट आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच मराठमोळ्या गिरिजा ओकने सुद्धा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Story img Loader