बॉलीवूडचा किंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान आज आपला ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी मध्यरात्रीपासून अनेक चाहत्यांनी शाहरुखच्या बंगल्याबाहेर गर्दी केली आहे. वाढदिवसानिमित्त जगभरातून शाहरुखवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान मराठी अभिनेते किरण माने यांनी शाहरुखच्या वाढदिवासनिमित्त खास पोस्ट शेअऱ केली आहे.

हेही वाचा- “एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?” ‘तो’ फोटो शेअर करत केतकी चितळेची पोस्ट; म्हणाली, “चुकून तो…”

Sharad Pawar on age
Sharad Pawar : “मी काय म्हातारा झालोय का? इथं एक म्हातारं…”, शरद पवारांचा मिश्किल सवाल; म्हणाले, “या लोकांच्या हाती…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…

किरण माने शाहरुखचे मोठे चाहते आहेत. याअगोदरही त्यांनी सोशल मीडियावर शाहरुखबाबत एक पोस्ट शेअर केली होती. आता पुन्हा इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टमध्ये किरण मानेंची शाहरुखचं कौतुक केलं आहे. तसेच त्याच्या चित्रपटांपासून त्या व्यक्तिमत्वापर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.

किरण माने यांची पोस्ट

शारख्या, त्यांना वाटलं सगळं जग आपल्या बापाचं हाय. आपन ‘बायकाॅट’ म्हन्लं की मानूस इंडस्ट्रीतनं आऊट ! आमच्या इरोधात बोलाल तर काम काढून घिवू. कोन पिच्चरला येनार नाय अशी व्यवस्था करू. ‘हम करे सो कायदा’ म्हनत त्यांनी गेमा करायला सुरूवात केली. कलाकारांमधली जी दोनचार टाळकी विरोधात बोलत होती, ती बी भेदरुन गप झाली. मग काय, बायकाॅट गॅंगला वाटलं ‘साला आपुनईच भगवान है” !

ह्या गॅंगच्या तू कायम टारगेटवर होतास. तू पाकिस्तानधार्जिना आहेस असं खोटं पसरवलं. तुझ्या मुलाला खोट्या प्रकरनात अडकवलं गेलं तवा तर गॅंगनं हैदोस घातला. लतादिदींच्या पार्थिवाजवळ फुंकर मारल्यावर ‘तू थुंकला’ असा कांगावा करत धिंगाना घातला

…लै मोठ्या गॅपनंतर तू आलास. नेहमीच्या स्वॅगमधी चालत… कापणारी नजर रोखत… केस उडवत. फूल्ल श्टाईल में ! बायकाॅट गॅंग चेकाळली. ‘आता ह्याला रस्त्यावर आनूया, लै माज करतोय स्स्साला’ म्हनत मोहिम सुरू केली. आल्याआल्या तू असा ‘पठाण’ लावला, का सात-आठशे करोड कमावल्याशिवाय काढलाच नाहीस. बायकाॅट गॅंग कळवळून बोंबलायला लागली. बाकी सगळं जग धुंद होऊन नाचत होतं “झुमे जो पठाण, मेरी जान, महफिल ही लूट जाये.”

कम्बख़्त कारस्थानी गॅंग धक्क्यातनं सावरेपर्यन्त ‘जवान’ लावलास… खाडकन मुस्काडात देत म्हन्लास, “बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर”.. परत हजार करोडचा दांडगा धुमाकूळ !

शारख्या, माणूस म्हनून तू लै लै लै ग्रेट हायेस. तुझं समाजभान, तुझी बुद्धीमत्ता, तुझं वाचन, तुझा सेन्स ऑफ ह्यूमर… आन् सगळ्यात महत्त्वाचं, जे मी लै ‘रिलेट’ करतो, तो म्हन्जे संकटावर उल्टी चाल करून जानं. निधड्या छातीनं.

ज्या काळात सत्ताधार्‍यांविरोधात एक शब्दबी उच्चारनं म्हन्जे काम हातातनं घालवनं… नायतर मागे ईडी लावुन घेनं… लैच झालं तर तुरूंगात जानं. त्या दहशतीच्या काळात तू थेट सिनेमातनं डंके की चोटपर भारतीय नागरीकांना सांगीतलंस, “जात-पात-धर्म-संप्रदाय के लिए व्होट देने के बजाय, जो आपसे व्होट माॅंगने आए, आप उससे सवाल पुछो ! पुछो उससे के अगले पाॅंच साल तक तुम मेरे लिए क्या करोगे? मेरे बच्चोंकी शिक्षा के लिए क्या करोगे? मुझे नौकरी देने के लिए क्या करोगे?? मै अगर बिमार पड गया तो मेरे परिवार के लिए क्या करोगे??? अगले पाॅंच साल तक तुम मेरे देश को आगे बढाने के लिए क्या करोगे… पुछो उससे.”

शारख्या, आज तुझा बड्डे ! लै लै लै जग. आम्हाला बख्खळ आनंद दे. प्रेरना दे. मनोरंजन, स्वॅग आनि समाजभान याचा काॅम्बो असलेला लाभावा ही आमची ‘मन्नत’ खुदानं पुरी केलेलीच हाय. असेच नादखुळा पिच्चर आनून तू आम्हाला ‘जन्नत’ दाखव. लब्यू शारख्या.

किरण मानेंच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून त्यांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर ‘बिग बॉस’मुळे ते घराघरात पोहचले. सध्या ते ‘कलर्स मराठी’वर “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” या मालिकेत सिधूताईंच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत.