महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्याविषयी समग्र लिखाण करणारे, ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. वयाच्या ६० व्या वर्षी एशियन हार्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. नुकतंच किरण माने यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेबद्दल आणि प्रा. हरी नरके यांच्याबद्दल भाष्य केले आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमध्ये किरण माने यांनी विलास पाटील ही भूमिका साकारली आहे. मात्र त्यांना या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर आता किरण माने हे ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकत आहेत.
आणखी वाचा : “सुभेदारांच्या समाधीसमोर बसलो अन्…” अजय पूरकर यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

किरण माने यांची पोस्ट

माझ्यावर झालेल्या खोट्या आरोपांविरूद्ध आणि अन्यायाविरूद्ध जीव खाऊन लढत होतो. मन रक्तबंबाळ झालं होतं पण मागं हटायचं नाही हे पक्कं ठरवलं होतं. अशावेळी सगळ्या गोष्टींची सत्यासत्यता पडताळून मला भावनिक बळ देणारी… माझ्या खरेपणावर विश्वास ठेवून, सतत फोन मेसेज करून मानसिक आधार देणारी जी मोजकी आणि मोठी लोकं होती त्यातले एक प्रा. हरी नरके !

मला त्याकाळातला आमचा एक मोठा फोन काॅल स्पष्ट आठवतो, ज्यात नरकेसरांनी माझ्या न्याय मिळवण्याच्या मार्गात कुणी-कुणी अडथळे आणले… त्यांचे हेतू काय होते… त्या लोकांचा इतिहास-भुगोल… त्यांनी माझं कशा पद्धतीनं खच्चीकरण करण्याचा प्लॅन आखला… ते सगळं सगळं अतिशय विस्तारानं आणि लाॅजीकल उदाहरणं देऊन समजावून सांगीतलं. त्यांनी आणखीही एक सल्ला दिला, जो खूप महत्त्वाचा होता… ‘आता या वाद-प्रतिवादांमध्ये वेळ आणि शक्ती खर्च करू नकोस. तू अभिनेता म्हणून पुन्हा उभं रहाणं हेच सगळ्या आरोपांवर खणखणीत उत्तर असेल.’

आज एक वर्षानंतर मी सगळ्यावर मात करून पुन्हा उभा रहातोय. माझ्यावर आलेल्या त्या भयाण संकटाच्या वेळी मला अडथळे आणणारे, खचवणारे यांना मी माफ केलंय. कणभरही रोष-कटुता काही काही नाही. पण त्याकाळात माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणारे मोजके लोक होते त्यांना शेवटच्या श्वासापर्यन्त विसरू शकत नाही. त्या विपरीत परिस्थितीला मागं टाकून अभिनेता म्हणून माझी पहिली कलाकृती टी.व्ही.वर येतीये. परवाच माझ्या मनात आलं की, ही सुंदर कथा छोट्या पडद्यावर येताना सगळ्यात पहिल्यांदा मला त्या देवमाणसांच्या चेहर्‍यावरचं हास्य मला पहायचं आहे, ज्यांनी मला वाईट काळात साथ दिली… त्यातले एक तुम्ही होतात, सर.

नरकेसर… तुमचे पुरोगामी विचार आणि त्यासंबंधीचं तुमचं कार्य यावर अनेकांनी लिहीलंय. मी एवढंच सांगतो की ज्या महात्मा फुलेंच्या जीवनावर, कार्यावर, विचारांवर अभ्यास करण्यात तुम्ही हयात घालवलीत त्या फुलेंच्या विचारांनी प्रेरीत झालेला, सगळ्या दुनियेचा विरोध पत्करून मुलीच्या शिक्षणासाठी रक्ताचं पाणी करणारा एक गरीब शेतकरी मी साकारतो आहे !

माझी अभिमान साठे ही ‘भुमिका’ पहायला तुम्ही हवे होतात सर…….., असे किरण माने यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “दादा कोंडकेंना अश्लील म्हणून हिणवलं…” किरण माने स्पष्टच बोलले, म्हणाले “उघडं सत्य बोलणारा एकही कलाकार…”

दरम्यान किरण माने हे लवकरच एका मालिकेत झळकणार आहेत. ते लवकरच ‘सिंधुताई माझी आई’ या मालिकेत झळकणार आहेत. यात ते अभिमान साठे ही व्यक्तीरेखा साकारताना दिसत आहेत. त्यात ते ‘चिंधीचे बाबा’ या भूमिकेत दिसणार आहेत.