मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणून किरण माने यांना ओळखले जाते. स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो मालिकेमुळे ते प्रसिद्धीझोतात आले. या मालिकेत त्यांनी विलास पाटील ही भूमिका साकारली होती. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात ते सहभागी झाले होते. सध्या त्या त्यांच्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.

किरण माने यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एका दिवाळी अंकाचा फोटो पोस्ट केला आहे. या दिवाळी अंकात किरण माने यांचा संघर्ष सांगितला आहे.
आणखी वाचा : कानटोपी, स्वेटर अन्…; आकाश ठोसरची केदारनाथ सफर, फोटोने वेधलं लक्ष

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
nikki tamboli trolled over bold video
बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळी ‘त्या’ बोल्ड व्हिडीओमुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले, “ही आपली संस्कृती नाही”
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित

किरण माने यांची पोस्ट

“…माझ्या आजवरच्या संघर्षाचा मागोवा घेणारा दिवाळी अंक निघेल, असा मी कधी स्वप्नातबी विचार केला नव्हता भावांनो ! मी स्वत:ला एवढा मोठा नक्कीच समजत नाही. पण मला अभिनेता म्हणून प्रेक्षकांचं, विशेषत: ग्रामीण मातीशी नाळ असलेल्या भावाबहिणींचं लै लै लैच प्रेम लाभलं, हे मात्र शंभर टक्के खरं. त्या प्रेमापोटी माझ्या चाहत्यांनी दिलेली ‘दिवाळी गिफ्ट’ म्हणून मी ‘झुंजार वीर’चा हा विशेषांक नम्रपणे स्विकारतो.

या अंकात सुरूवातीला माझ्या ‘बिगबाॅस’ या रिॲलिटी शो मधला माझ्या प्रवासाचा वेध, बिगबाॅस खेळाच्या ‘डाय हार्ड’ चाहत्या आणि अभ्यासक स्वरा गीध यांनी घेतला आहे. त्यानंतर माझ्याच वेगवेगळ्या फेसबुक पोस्टस् संकलीत करून त्यातनं माझा आजवरच्या आयुष्याचा प्रवास, अभिनयक्षेत्रातला संघर्ष, जवळची माणसं, विचारधारा याचा उलगडा करण्याचा प्रयत्न ‘झुंजार वीर’च्या या दिवाळी अंकानं केला आहे. अंकाला शिर्षक आहे, ‘तुका आशेचा किरण’ !

बाकी कायबी असो, मला प्रेक्षकांची मनापास्नं आभाळभर माया मिळलीय. मला एका सिरीयलमधनं काढून टाकल्यावर महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांनी उत्सफूर्तपणे मला दिलेला ‘सपोर्ट’ असेल… मला गांवोगांवी व्याख्यानांसाठी बोलावणं असेल… बिगबाॅसमध्ये मी असताना डोंगराएवढा पाठिंबा देऊन मला फायनलीस्ट बनवणं असेल… बिगबाॅसमधून आल्यानंतर गांवोगांवी माझ्या मिरवणूका काढणं, ‘बिगबाॅस पब्लीक विनर किरण माने’ असे फ्लेक्स लावणं… दर महिन्याला एक, अशा संख्येनं सतत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करणं… किंवा शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि तुकोबारायांच्या विचारांच्या प्रसारासाठी अनेक सामाजिक उपक्रमात मला हक्कानं बोलावणं… या वर्षावानं मी अक्षरश: भारावून गेलोय.

ज्या-ज्या गांवात शुटिंगला जातोय, तिथल्या घराघरांत लोक बोलवू इच्छितात. माझ्या ‘विलास पाटील’ आणि ‘अभिमान साठे’ या भुमिकांच्या चाहत्या असलेल्या माझ्या अनेक भगिनी माझे आवडते पदार्थ करून खाऊ घालण्यासाठी धडपडतात. कालच मी कोळे नांवाच्या गांवात शुटिंग करत असताना एका घरातनं आवाज आला, “किरणसर, तुमच्यासाठी खास तुमचे आवडते बेसनाचे लाडू केलेत. यायलाच लागतंय तुम्हाला आता.”

या ॠणात रहायला कायम मला आवडेल. इथून पुढेही माझ्या चाहत्यांना अभिमान वाटेल असंच काम माझ्या हातून होईल. अभिनयप्रवासाचा आलेख कायम उंचावलेलाच दिसेल. विचारधारेवरून मला हितशत्रूंनी कितीही त्रास देऊदेत, ट्रोल करूदेत, त्या विरोधाला झुगारून देऊन मी निडरपणे आपल्या सगळ्या महामानवांच्या विचारांचा प्रसार करेन… बुद्धापास्नं तुकोबारायापर्यन्त माझी नाळ जोडलेली हाय भावांनो. त्यामुळं कितीबी आघात झाले, तरी शेवटच्या श्वासापर्यन्त माझी मूळं मी सोडणार नाय”, असे किरण माने यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा : प्रसाद ओकला लागली परदेशात शिकणाऱ्या लेकाला भेटण्याची ओढ; फोटो शेअर करत म्हणाला…

दरम्यान किरण माने यांच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. सध्या किरण माने हे ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकत आहे.