मराठी अभिनयविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. रेश्मा शिंदे, वैष्णवी कल्याणकर, शाल्व किंजवडेकर, श्रद्धा रानडे, अभिषेक रहाळकर यांच्यासह इतरही अनेक मराठी कलाकार मागील काही लग्नबंधनात अडकले. ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री दिव्या पुगावकर आज लग्नबंधनात अडकणार आहे. कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच बिग बॉस मराठी फेम अंकिता प्रभू वालावलकर हिचंही आज लग्न आहे. याचदरम्यान एका मराठी अभिनेत्याने साखरपुड्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
अभिनेत्याने त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. या अभिनेत्याचे नाव कुणाल धुमाळ आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘शेर शिवराज’, ‘पिंकीचा विजय असो’, ‘पावनखिंड’ अशा मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा कुणाल धुमाळ लवकरच लग्न करणार आहे. त्याचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. त्याच्या साखरपुड्याच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.
कुणाल धुमाळच्या होणाऱ्या पत्नीचे नाव डॉ. सोनाली काजबे असं आहे. सोनाली ही डेंटल सर्जन व कन्सल्टंट पिडियाट्रिक डेंटिस्ट आहे. सोनाली काजबे ६ वर्षांपूर्वी २०१९ मध्ये मिस महाराष्ट्र ठरली होती. कुणाल व सोनाली यांनी पारंपरिक पद्धतीने साखरपुडा केला. साखरपुड्यात कुणाल व सोनाली खूपच सुंदर दिसत होते.
पाहा पोस्ट –
कुणालने साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यावर त्याच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्याचे व सोनालीचे अभिनंदन केले आहे. अक्षया नाईक, अंबर गणपुळे, प्राप्ती रेडकर, अदिती द्रविड, सौरभ चौघुले, तन्वी मुंडले, संग्राम समेळसह अनेक कलाकारांनी कुणाल व सोनालीला शुभेच्छा दिल्या आहेत.