छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ ला ओळखले जाते. याच कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशलची पत्नी सुनयना ही उत्तम कथ्थक डान्सर आहे. नुकतंच त्याने त्याच्या बायकोसाठी अभिमानाने एक पोस्ट शेअर केली आहे.

कुशल बद्रिकेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरवर मुघल-ए-आझमचा फ्लॅश मॉब सुरु असल्याचे दिसत आहे. यात त्याची पत्नी सुनयनाही सहभागी झाली आहे.
आणखी वाचा : “जायचं तर जा, आम्हाला…” अमेरिकेला निघालेल्या पत्नीसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, म्हणाला “तू परत येशील तेव्हा…”

या व्हिडीओला तिने हटके कॅप्शन दिले आहे. “मोठी कामगिरी, मोठी कामगिरी म्हणतात ना ती हीच… अभिनंदन मुघल-ए-आझमची टीम”, असे त्याने म्हटले आहे.

कुशलची पत्नी सुनयना ही उत्तम कथ्थक डान्सर आहे. सध्या ती ‘मुघल-ए-आझम’ या रंगभूमीवरील महानाट्य काम करताना दिसत आहे. या नाटकाची टीम ही अमेरिका दौऱ्यासाठी गेली आहे.

आणखी वाचा : सिद्धार्थ जाधवला नेटकऱ्याने आईवरुन दिली शिवी, अभिनेता संतप्त होत म्हणाला “शिवी देणं…”

दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांनी ‘मुघल-ए-आझम’ या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकात मराठमोळी अभिनेत्री प्रियंका बर्वे ही अनारकली हे पात्र साकारत आहे.

Story img Loader