‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा विनोदी कार्यक्रम चांगलाच गाजला. या कार्यक्रमाने १० वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम केलं. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामुळे कुशल बद्रिके ( Kushal Badrike ) घराघरात पोहोचला. कुशलने आपल्या विनोदाच्या अचूक टाइमिंगच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. कुशलने नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. तसंच त्याने मराठीसह हिंदीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपल्या कामासह वैयक्तिक आयुष्याबाबत कुशल पोस्ट शेअर करत असतो. तो अनेकदा मजेशीर पोस्ट लिहित असतो. अशीच एक मजेशीर पोस्ट नुकतीच त्याने बायको संदर्भात लिहिली.

हेही वाचा – दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”

कुशलने बायको सुनयना बद्रिकेबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो बायकोबरोबर वेगवेगळ्या पोझमध्ये पाहायला मिळत आहे. हेच फोटो शेअर करत कुशलने लिहिलं आहे, “संसारात एक बोलणारं आणि एक ऐकणारं हवं तरच संसार नीट चालतो, आमच्या संसारात मी बोलणारा… आणि आमची ‘ही’ मला जरा जास्तच बोलणारी आहे ….आमचा संसार चालत नाही तो आम्हाला घाबरून पुढे पुढे धावतोय.”

हेही वाचा –  “माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

कुशल बद्रिकेच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “ही जो सध्या तू नवऱ्याचा अभिनय करतो त्यासाठी तरी ऑस्कर द्यायला पाहिजे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, असाच सुखाने धावत संसार चालू दे तुमचा. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तुला कसं सुचतं?”

Story img Loader