गेली अनेक वर्ष त्याचा विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य असलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेकडे पाहिले जाते. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामधील त्याच्या कामाचे नेहमीच भरभरून कौतुक होते. त्याच्या विनोदाच्या टायमिंगला आणि त्याच्या उत्स्फूर्तेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. नुकतंच कुशलने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

कुशल बद्रिके हा इन्स्टाग्रामवर सक्रीय असतो. तो कायमच विविध पोस्ट करताना दिसतो. नुकतंच कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. याला त्याने बालपणीची गोष्ट सांगितली आहे.
आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”

prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Ajit Pawar Statement About Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Murder : अजित पवारांचं संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य; “सिव्हिल सर्जन म्हणाला, पोस्टमॉर्टेम करताना आजवर इतकी वाईट…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”

कुशल बद्रिकेची पोस्ट

“म्हातारीच्या कापसाची गोष्ट.
लहानपणी, अलगद ओंजळीत झेललेल्या ”म्हातारीच्या कापसाला” मी हळूच फुंकर घालायचो की तो कापूस हवे सोबत उडत… उडत… जायचा मग पुन्हा अलगद त्याला ओंजळीत झेलायचं,पुन्हा फुंकर, पुन्हा हवा, तोच खेळ पुन्हा पुन्हा. मग कधीतरी जोराचा वारा यायचा आणि कुणास ठाऊक कुठे ? पण “म्हातारीचा कापूस” घेऊन लांब… उडून जायचा आणि मी… मी त्या उडत जाणाऱ्या “म्हातारीच्या कापसाकडे” नुसतं बघत रहायचो, असहायपणे तो दिसेनासा होईपर्यंत.
आणि मनात मात्र खूप दुःख-दुःख व्हायचं.
त्यावेळी त्या “म्हातारीच्या कापसाने” मनाला झालेली जखम आजपर्यंत कोणत्याच कापसाने टिपता आली नाही मला.
हल्ली, काही नाती सुद्धा त्या “म्हातारीच्या कापसासारखी” अलगद ओंजळीतून निसटून जात आहेत आणि मला मात्र पुन्हा लहान झाल्यासारखं झालंय, “उडून जाणाऱ्या म्हातारी कडे नुसतं बघत बसणारं एक लहान मुल”, असे कॅप्शन कुशल बद्रिकेने म्हटले आहे.

आणखी वाचा : “इंग्रज कोकणस्थ ब्राह्मणांना आपली औलाद म्हणून सोडून गेले”, म्हणणाऱ्याला मराठी अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, “ही भाषा…”

कुशलच्या या पोस्टवर अभिनेता संतोष जुवेकरने कमेंट केली आहे. “तू आता फक्त २ बोटं उरलायस शाहरुख व्हायला, होशील लवकरच होशील. फक्त आता केस सतत डोळ्यावर येण्याची acting करत रहा”, असे संतोष जुवेकरने म्हटले आहे.

Story img Loader