‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. कुशल आपल्या कामाव्यतिरिक्त अनेक मजेशीर पोस्ट शेअर करत असतो. कधी ती पोस्ट बायको संदर्भात तर कधी मित्रांसंदर्भात पोस्ट लिहित असतो. नुकताच त्याने बायको सुनयना बद्रिके आणि मुलाचा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ बरोबरच त्याने बायकोचे मजेशीर किस्से देखील सांगितले आहेत. कुशलच्या या पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभिनेता कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याची बायको गाडीमध्ये सतत झोपलेली दिसत आहे. तसंच मुलगा कधी अभ्यास करताना झोपलेला दिसतोय तर कधी बेडच्या टोकावर झोपलेला दिसत आहे. बायको आणि मुलामधील असलेल्या याच स्वभावविषयी कुशलने लिहिलं आहे.
कुशलने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “आमची ‘ही’ लग्नात शपथ घेऊन म्हणाली होती की ‘साता जन्माचा प्रवास एकत्र करू’ म्हणून. पण प्रवासात ‘ही’ झोपून राहील अशी शंका मला झोपेत सुद्धा आली नाही. आमच्या लग्नानंतर काही काळ आम्ही चाळीत राहिलोय तेव्हाची गोष्ट सांगतो, मी शूटिंग संपवून रात्री उशिरा घरी आलो. दार वाजवून वाजवून थकलो. हिने जवळ जवळ अर्धातास दार उघडलं नाही. आतून फोन सुद्धा उचलेना. मी घाबरलो आणि स्वतःच्याच घरात मागच्या खिडकीने चोरासारखा आत शिरलो, पाहातो तर आमचा कुंभकर्ण ढाराढूर झोपलेला.”
पुढे आणखी एक किस्सा कुशल बद्रिकेने सांगत लिहिलं, “हल्लीची गोष्ट सांगतो मी एका हिंदी शोचं शूट आटपून उशिराने घरी पोहोचलो. (आता मी आठवणीने घराची किल्ली घेऊन जातो) तर हिला झोपेतच कुणाची तरी चाहूल लागली आणि हिला वाटलं की घरात चोर शिरलाय. त्यावर उपाय म्हणून माझी बायको झोपूनच राहिली, की उगाच मग चोराला वाटेल की आम्ही जागे आहोत आणि मग तो आम्हाला त्रास देईल. माझी खात्री आहे की देव कोवाला (Koala) नावाचा प्राणी बनवायला गेला असणार, जो दिवसातून १८ तास झोपतो आणि त्याची रेसिपी चुकल्यामुळे आमच्या सुनयनाचा जन्म झाला असणार. हिचा हाच स्वभाव माझ्या मुलात सुद्धा उतरलाय. ऐन परीक्षेत बारा बारा तास झोपून राहतो यार. ‘अश्या अर्थाने स्वतःच्या आईची गादी चालवणारा मुलगा महाराष्ट्रात माझ्याच घरात जन्माला आला,’ असं म्हणायला हरकत नाही. या दोघांच्या अश्या स्वभावामुळे आता ‘माझी’ मात्र झोप उडालीये. यावर उपाय म्हणून माझी बायको मला म्हणते, कुशल… ‘थोडा वेळ झोप , तुला बरं वाटेल’ – सुकून”
कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री पल्लवी वैद्य, किशोरी अंबिये यांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. एका चाहत्याने लिहिलं आहे, “व्हिडीओ पेक्षा लिहिलेलं वाचून जास्त हसायला आलं. हे एक कलाकारच लिहू शकतो.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “खरंतर त्यांनी तुमच्या उडालेल्या झोपेवर रामबाण उपाय सांगितला…झोप थोडा वेळ.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आम्ही झोपाळू.”
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’नंतर कुशल बद्रिके ‘सोनी टीव्ही’वरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमात पाहायला मिळाला. या कार्यक्रमातील कुशल, हेमांगी आणि गौरवच्या स्किटचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असायचे. अलीकडेच कुशल आणि त्याची बायको शिंदे सरकारच्या जाहिरातीमध्ये एकत्र पाहायला मिळाले.