‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. कुशल बद्रिकेने आजवर अनेक प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सध्या तो त्याच्या एक चित्रपटाच्या शूटींगनिमित्त लंडनला गेला आहे. त्या निमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे तो चर्चेत आला आहे.

कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लंडनला जाताना एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटो सध्या चांगला व्हायरल होत आहे. या फोटोला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे. त्याबरोबर त्याने परदेशात शूटींगचा अनुभवही सांगितला आहे.
आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

कुशल बद्रिकेची पोस्ट

“मी एकट्याने कधीच सिनेमा पाहीलेला नाही, इंटरवल, मधला समोसा आणि पॉपकॉर्न शेअर करण्यात सिनेमापेक्षा जास्त मज्जा आहे अस मला नेहमी वाटत, एकटाच असा हॉटेल मद्धे जाऊन मी कधी जेवलेलो नाही, मला काय ऑर्डर करावं हेच सुचत नाही , तसंच एकट्याने प्रवास करायला सुद्धा मला आवडत नाही, कदाचित मला माझ्याच सोबत खुप बोर होत असावं, पण आज सिनेमाच्या शूटींगसाठी एकटं लंडनला जावं लागतय,

इंटरनॅशनल प्रवासात, पृथ्वी चा व्यास ओलांडताना घड्याळाचा तासही बदलतो ही गोष्ट मला अजूनही जादुई वाटते. खिडकीतून दिसणारे ढग, ढगांच्या चाळणीतून दिसणारा समुद्र, त्यातुन डोकावणारा सुर्यप्रकाश अवेळी रात्र ह्या सगळ्यात कुणीतरी गप्पा मारणार हव यार.

पण आयुष्याच्या प्रवासात शेवटापर्यंत आपल्याला साथ करणारे फक्त आपणच असतो, काही लोक हाथ सोडवून घेतात तर काहींचे हाथ आपल्या हातून अलगद सुटतात, शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच करावा लागतो. मग एखादा विमान प्रवास एकट्याने करायला काय हरकत आहे ,
पण तरीही वाटतं…. किमान इंटरनॅशनल प्रवासामधे आपल्या वाट्याचे 2-पेग प्यायला तरी कुणी हवं होतं….हॅप्पी जर्नी टू मी”, अशी पोस्ट कुशल बद्रिकेने शेअर केली आहे.

आणखी वाचा : नृत्यांगना, अभिनेत्री ते राजकारण, शिंदे गटात जाणाऱ्या दीपाली सय्यद यांच्याबद्दल माहितीये का?

कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. ‘हा फोटो श्रेयाने काढल्यासारखा का वाटतोय’, अशी कमेंट अभिनेत्री अभिज्ञा भावेने केली आहे. त्याबरोबर सुकन्या मोने यांनी यावर ‘सांभाळून जा रे,अरे मला सांगायचं होतं मी आले असते की…..’ अशी कमेंट केली आहे.

Story img Loader