‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. कुशलला मनोरंजन क्षेत्रात येण्यासाठी प्रचंड मेहनत करवी लागली. या सर्व काळात त्याला त्याची पत्नी सुनयना बद्रिकेने खंबीरपणे साथ दिली. नुकतंच कुशलने त्याची पत्नी सुनयनासाठी खास पोस्ट केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुशलची पत्नी सुनयना ही उत्तम कथ्थक डान्सर आहे. सध्या ती ‘मुघल-ए-आझम’ या रंगभूमीवरील महानाट्य काम करताना दिसत आहे. सध्या या नाटकाची टीम ही अमेरिका दौऱ्यासाठी निघाली आहे. त्याच निमित्ताने कुशलने सुनयनासाठी एक पोस्ट केली आहे. त्याद्वारे त्याने तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.
आणखी वाचा : Video : “४५ हून अधिक वर्ष लोटली तरी…” नाना पाटेकरांनी केला मैत्रिणींचा खास पाहुणचार

कुशल बद्रिकेची पोस्ट

“यार सुनयना,
तू काय बाबा आता “अमेरिकेला” जाणार, “मुघल ए आजम” मधे, डांस बिंस करणार, पिझ्झा बर्गर खाणार , झ्याक-प्याक राहणार..
जायचं आहे तर जा, “आमाला काय…. बाबा”
खरंतर एवढे दिवस तुझ्यावाचून राहायची सवय नाही ना “घराला” म्हणून जरा काळजाला “घरं” पडल्या सारखं झालंय बस.
बाकी तू परत येशील तेंव्हां…..
हा ऋतू बदलला असेल, पाऊस, “कुणीतरी पाणी शिंपडावा” एवढाच् उरला असेल, शाळेत मुलांचे वर्ग आणि मित्र बदललेले असतील, “मनुची” हाफ पँट जाऊन फुल पँट आली असेल, “गंधूची” परीक्षा जवळ आल्यामुळे अख्ख घर अंडरप्रेशर असेल,
काय गंमत आहे बघ, कधी काळी, “आपलं सुद्धा एक घर असेल”, अशी स्वप्नं पापण्यांत घेऊन, आपण घराच्या वाटेकडे डोळे लाऊन बसायचो, आता “तुझ्या” वाटेकडे “आपलं घर” डोळे लाऊन बसेल….
आणि मी………..
मी, छोट्टीशी खोली होऊन जाईन त्या घरातली, नुसत्या भिंतींची…. तुझ्या वाचून रिकामी………. (सुकून)

तळ टिप:- तुला संधी देणाऱ्यांचे मनापासून आभार
आणि मुघलांनी अमेरिके वर कधीच राज्य केलं नाही, पण “मुघल ए आजम” ह्या तुमच्या कार्यक्रमाने अख्खी अमेरिका जिंकावी ह्या सगळ्यांना शुभेच्छा”, अशी पोस्ट त्याने केली आहे.

आणखी वाचा : “तुम्ही सॉफ्टवेअर उद्योजक आणि ती…” पतीबरोबर फ्लाईटमध्ये घडलेल्या ‘त्या’ घटनेवर सुधा मूर्तींनी केलेले भाष्य, म्हणाल्या “सिनेसृष्टीतील कलाकारांचे…”

दरम्यान दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांनी ‘मुघल-ए-आझम’ या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकात मराठमोळी अभिनेत्री प्रियंका बर्वे ही अनारकली हे पात्र साकारत आहे. तर सुनयना ही याच नाटकात काम करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor kushal badrike share instagram post for wife sunayna mughal e azam drama tour for america nrp