छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ ला ओळखले जाते. या विनोदी मालिकेतून अनेक कलाकार घराघरात पोहोचले. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. उत्तम अभिनय व त्याला विनोदाची अचूक जोड या जोरावर कुशलने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. नुकतंच कुशलने ट्रेन आणि स्टेशन याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

कुशल बद्रिके हा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तो त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल कायमच चाहत्यांना माहिती देत असतो. नुकतंच कुशलने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत कुशल हा एका ठिकाणी बसून विचारत मग्न झाल्याचे दिसत आहे. याला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री, स्वत:च पोस्ट करत म्हणाली “गेली दोन वर्ष…”

PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत, “मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, कारण..”
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा

कुशल बद्रिकेची पोस्ट

“स्ट्रगल काळातल्या ट्रेनच्या प्रवासात, कधीकधी चुकून डुलकी लागायची, थोड्यावेळाने डोळे उघडले की आजूबाजूला वेगळीच माणसं दिसायची, खिडकीतून बाहेर डोकावलं तर वेगळेच रस्ते, वेगळ्याच बिल्डिंग्स, आणि मग लक्षात यायचं, की सालं आपण उतरायचं ”स्टेशन” तर मागेच राहून गेलं !

मग पुढल्या एखाद्या अनोळखी स्टेशनला उतरायचं, अनोळखी पाट्या, अनोळखी स्टॉल्स, अनोळखी माणसं. पण इंडिकेटर वरची “रिटर्न ट्रेन” मिळेपर्यंत, सगळं ओळखीचं होऊन जायचं.

आयुष्याचा प्रवासही थोड्याफार फरकाने असाच असतो, नाही का? आपण थांबायचं ठिकाण चुकलं की मग एका अनोळखी जगाचा प्रवास सुरू होतो…. फक्त आयुष्याच्या प्रवासात कोणत्याच इंडिकेटरला रिटर्न ट्रेन नसते. आपलं उतरायचं स्टेशन आणि माणसं एकदा चुकली, की चुकली…….. (सुकून)”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘क्रश’ प्रकरणानंतर पहिल्यांदाच ओंकार भोजने आणि कोण हार्टेड गर्लची भेट, लाजत म्हणाली “‘त्या’नंतर…”

कुशलने केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. सध्या तो एका चित्रपटाच्या शूटींगच्या निमित्ताने लंडनला गेला आहे. त्याचे अनेक फोटोही त्याने पोस्ट केले होते.