‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. कुशल बद्रिके कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने आतापर्यंत अनेक प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. नुकतंच कुशल बद्रिकेने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने क्यूब आणि आयुष्य याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुशल बद्रिके सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. आज सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर त्याचा त्याच्या मुलाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. यात त्याच्या लहान मुलाने रुबीक क्यूब सोडवल्याचे सांगितले आहे. त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “आम्ही दोघंही…” स्नेहल शिदमबरोबरच्या ‘त्या’ फोटोवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेची पहिली प्रतिक्रिया

कुशल बद्रिकेची पोस्ट

“माझ्या मुलाला हे असले खेळ खूप आवडतात, त्याला Rubik’s cube भारी सोडवता येतं, तो पुन्हा पुन्हा ते shuffle करुन पुन्हा पुन्हा सोडवतो. मला खूप प्रयत्न करुन पण ते कोडं सोडवणं कधीच जमलं नाही. बर अख्ख जाऊदे, त्याची नुसती एक बाजू सुद्धा कधी clear करता आली नाही.
म्हणूनच मला हे rubik’s cube, आयुष्या सारखं वाटतं .
“आपणच गुंता वाढवायचा आणि आपणच सोडवत बसायचं”.
मला, ना-कधी rubik’s cube सोडवता आलं, ना आयुष्य .
कोडं सुटलं नाही तर खेळ सोडता येतो, आयुष्य कसं सोडायचं?”, असे त्याने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : “कशालाच काही अर्थ नाही…” कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

त्याच्या या पोस्टखाली अनेक चाहते कमेंट करतानाही दिसत आहेत. अनेकांनी त्याच्या या पोस्टचे कौतुक केले आहे. तर काहींनी त्याच्या या पोस्टखाली बरोबर, एकदम बरोबर बोललात तुम्ही, अशा कमेंट केल्या आहेत. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.