विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची… आज आषाढी एकादशी. अवघा महाराष्ट्र आज विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. पंढरपूरसह राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी करत विठूरायाचं दर्शन घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीनिमित्त अनेक कलाकार विविध पोस्ट शेअर करत आठवणी ताज्या करताना दिसत आहे. नुकतंच अभिनेता कुशल बद्रिकेच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.
कुशल बद्रिके हा इन्स्टाग्रामवर सक्रीय असतो. तो कायमच विविध पोस्ट करताना दिसतो. नुकतंच कुशलने इन्स्टाग्रामवर विठ्ठल-रुक्मिणीच्या मुर्तीचा एक फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना त्याने विठ्ठलाच्या दर्शनाबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला बाथटबमधील बोल्ड फोटो, कॅप्शन चर्चेत
कुशल बद्रिकेची पोस्ट
“अख्खी वारी करून ‘वारकरी’ नुसतं कळसाच्या पाया पडून परततात आणि मग लोक “विठ्ठल” म्हणून त्या वारकऱ्याच्याच पाया पडतात.
ज्या वारकऱ्याने वारीत “प्रत्यक्ष” विठ्ठलाचं दर्शनच घेतलं नाही, तो स्वतःच “विठ्ठल” होऊन परततो .
आणि इकडे रखुमाईच्या जन्माला येऊनही “विठ्ठल” नशिबात नसतो .
दैवं सुद्धा कधी कधी कळसच गाठतं. नाही का ?
असो… आषाढी एकादशीच्या शुभेच्छा”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.
आणखी वाचा : “माझा आता कोणताही संबंध नाही…” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने दिला राजीनामा
दरम्यान कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करत त्याला आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी खूप मस्त लिहिलं आहे, असे त्याला सांगितले आहे.