कुशल बद्रिके मराठी मनोरंजनसृष्टील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून कुशल घराघरांत पोहचला. कुशलला विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणूनही ओळखले जाते. आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर कुशलने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर कुशल मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे व्हिडीओ व फोटो शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुशल नेहमीच आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसतो. आपली पत्नी व मुलाबरोबरचे अनेक व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. या व्हिडीओमधून कुशलचे त्याच्या मुलाबरोबर प पत्नीबरोबर खास बॉन्डिंग असल्याचे दिसून येते. दरम्यान कुशलने सोशल मीडियावर पत्नीचा शेअर केलेला व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

हेही वाचा- “चिपळूण सोडून मुंबईत आले अन्…” आई-वडिलांच्या आठवणीत मराठमोळी अभिनेत्री भावुक, म्हणाली, “७ वर्षे झाली…”

कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची पत्नी सुनयना गाडी चालवताना दिसत आहे. गाडी चालवताना ती एका हाताच्या सहाय्याने नृत्याचा सराव करत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने “मी काय म्हणतो, माझ्या जीवाशी खेळ का ओ? मला तरी गाडी चालवू दे” असं म्हटलं आहे. असे म्हणले आहे. कुशलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेट केल्या आहेत.

कुशलने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताच त्याची बायको सुनयनाने यावर रिप्लाय दिला आहे.सुनयनाने रागाने “माझी स्टोरी ताबडतोब डिलीट कर” असा मेसेज केला आहे. पण कुशलने “मी नाय जा” असं उत्तर दिलं आहे. कुशलच्या या उत्तरावर सुनयना चांगलीच चिडल्याचे दिसून आले.