स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या या मालिकेतील काम करणाऱ्या कलाकारांना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. या मालिकेने नुकतंच १००० भाग पूर्ण केले. यानिमित्ताने मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची संपूर्ण टीम केक कापून सेलिब्रेशन करताना दिसत आहे. त्याला त्यांनी कॅप्शन दिलं आहे.
आणखी वाचा : “एखाद्याची कविता रील बनवण्यासाठी वापरताना…”, जितेंद्र जोशीने व्यक्त केला संताप, म्हणाला “नावाचा उल्लेखही…”

Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
High Court asks Censor Board over the exhibition certificate of the film Emergency Mumbai print news
देशातील नागरिक मूर्ख वाटतात का ? ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शन प्रमाणपत्रावरून उच्च न्यायालयाची सेन्सॉर मंडळाला विचारणा
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
BAPS Swaminarayan Temple
न्यूयॉर्कमध्ये स्वामीनारायण मंदिराची तोडफोड; भिंतींवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा, भारतीय दुतावासाने नोंदवला तीव्र निषेध

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“श्रद्धा आणि सबुरी”
‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे 1000 एपिसोड पूर्ण झाले आहेत. 7.12.2019 या मालिकेचे शूटिंग सुरू केलं, त्यावेळेला माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न होते, पण वाटत नक्की होतं की ही सिरीयल खूपच लोकांना भावेल, खूप आवडेल हि serial , त्याचं मुख्य कारण म्हणजे या सिरीयलच्या नावामध्ये “आई “या शब्दाचा उल्लेख आहे, आणि दुसरं कारण होतं राजन जी शाही, आपल्या क्रिकेटच्या टीम मध्ये सचिन तेंडुलकर आहे म्हटल्यानंतर आपली टीम भारीच खेळणार आणि जिंकणार, असा एक वेगळा कॉन्फिडन्स खेळाडूंना असेल ना , तसाच आमच्या या “आई कुठे काय करते” च्या टीम मध्ये राजनशाही आहेत, राजन शाही एक मराठी सिरीयल करतायेत म्हटल्यावर ती उत्कृष्टच होणार, याची एक वेगळीच खात्री सगळ्या ना होती,

डायरेक्टर्स कट प्रोडक्शन चे सर्वेसर्वा राजन जी , हे आम्हाला प्रोड्युसर लाभले होते, नमिता वर्तक म्हणजेच कमलाकर नाडकर्णी यांची कन्या, जिने खरंतर मला या सिरीयल साठी माझी “अनिरुद्ध देशमुख” या पात्रासाठी निवड केली, उत्कृष्ट इतर सगळे कलाकार, उत्कृष्ट दिग्दर्शनाची टीम, उत्कृष्ट सेटिंग, उत्कृष्ट लेखन, सगळंच या सिरीयल मधलं भारी होतं, स्टार प्रवाह चॅनल ने सुद्धा सिरीयलचे प्रमुख उत्कृष्ट केले होते, पहिल्या दिवसापासूनच लोकांच्या मनामध्ये ही सिरीयल बसली,

खरंतर मी एक odd man out होतो, मी जे कॅरेक्टर करत होतो अनिरुद्ध देशमुख नावाचं, ते सुद्धा odd man out आहे, पहिल्यांदा ज्यावेळेला नमिताने माझी राजन शाही यांच्याशी ओळख करून दिली, त्यावेळेला माझ्याविषयी त्यांच्या डोळ्यांमध्ये मला फार काही confidence दिसला नाही, तसं ते मला काही बोलले नाहीत तरी, पहिल्या भेटीत मला ते जाणवलं होतं, पण त्यांचा नमितावर खूप कॉन्फिडन्स होता आणि तिच्यावर खूप विश्वास होता, आणि म्हणून खरंतर माझं कास्टिंग या इतक्या भारी रोल साठी झालं, “ श्रीमोई “ नावाची बंगाली मालिके चं हे सुरुवातीला रूपांतरण होतं, त्यामध्ये जो अनिरुद्ध देशमुख होता, तो अगदी भारदस्त व्यक्तीमहत्त्व होतं, त्याचे काही episodes मला राजनजींनी पाहायला सांगितले होते, ते भाग पाहिल्यानंतर मी जरा घाबरलोच होतो.

अमरीश पुरी सारखी त्याची पर्सनॅलिटी होती, team ने मला सांभाळून घेतलं, एक हजार एपिसोड नंतर सुद्धा मला सांभाळून घेत आहेत, त्यांनी एक वेगळाच अनिरुद्ध देशमुख माझ्याकडून करून घेतला, या आई कुठे काय करते च्या टीमने. DKP राजन जी, स्टार प्रवाह पासून आमच्या अगदी स्पोर्ट बॉय पर्यंत सगळ्यांचा मी ऋणी आहे सगळ्यांचा मी आभारी आहे ! आज सेटवर छान हवन पूजा झाली, 1000 एपिसोड चा केक आज आम्ही कापला, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”

दरम्यान ‘आई कुठे काय करते’ ही मालिका २०१९ मध्ये सुरु झाली. या मालिकेने अल्पावधीतच एक वेगळे स्थान निर्माण केले. मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.