‘आई कुठे काय करते’ ही मालिका नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच चर्चेत असतात. मिलिंद गवळी यांनी नुकतंच बाईकबद्दल त्यांचे असणारे प्रेम आणि आठवणी ताज्या केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. त्यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ते गाडी चालवताना दिसत आहे. याला त्यांनी हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : Video : रेल्वेतील डिजीटल बोर्डवर मराठीतील सूचना पाहून अभिनेता संतप्त, म्हणाला “चौथीतील मुलांकडून लिहून घेतलं असतं तर…”

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“वेड

एखाद्या गोष्टीचं लहानपणापासून आपल्याला खूप वेड असतं आणि ते आपल्या मधलं वेड कधीही जात नाही,
मोटरसायकलचं माझं वेड तसंच आहे, आत्ता मोटरसायकल माझ्या काहीही उपयोगाची वस्तू राहिलेली नाही, तरीसुद्धा आपल्याकडे एखादी मोटरसायकल असावी अशी जबर इच्छा अजूनही मनामध्ये आहे, आणि ती इच्छा मी सतत अनेक वर्ष मारत असतो, मनाला लहान मुलासारखं समजून सांगत असतो की, आता हे वेड दे सोडून, पण “दिल है कि मानता नही” शाळेत असताना सायकलचा खूप वेड होतं, आई म्हणाली “मी तुला सायकल कधीही घेऊ देणार नाही ” कारण तू ती सायकल घेऊन रस्त्यावर जाशील, लहान मूल सायकल घेऊन रस्त्यावर जाणं म्हणजे त्या काळामध्ये खूपच dangerous होतं.

पण मी हट्टी होतो मी एक नाही तर दोन सायकली घेतल्या. मग काय मग कॉलेजमध्ये मोटर सायकल हवी आहे म्हणून हट्ट करायला लागलो, आई म्हणाली मी तुला कधीही मोटरसायकल घेऊन देणार नाही ते तर आणखीनच डेंजरस, आई नाहीच म्हणायची, बारावीत असताना मी दोन कोचिंग क्लासेस मध्ये जायचं, पोर्तुगीज चर्चला दयासरां चे क्लासेस असायचे, दादर स्टेशनला पिंगेज क्लासेस मध्ये जायचं, दया सरांचा क्लास संपला की तिकडूनं चालत चालत दादर स्टेशन ला जायचो, एकदा आई ने मला तसं घाईघाई चालत चालत जाताना पाहिलं आणि तिला खूप वाईट वाटलं, वडिलांना म्हणाली “माझं लेकरू रोज इतक्या लांब चालत क्लासेसला जातो, बिचाऱ्याला घेऊन द्या एखादी बाईक”, आणि मग त्यांनी मला रू १७,०००/- ची हिरो होंडा १०० cc bike . घेऊन दिली.

आणि मग माझ्या adventurous life ला सुरुवात झाली, तब्बल आठ वर्ष ती हिरो होंडा मुंबईच्या कानाकोपऱ्यात फिरवली, मुंबईतली अशी एकही जागा मी सोडली नाही जिथे ती बाईक मला घेऊन गेली नाही, मुंबईतली गल्ली बोळ मी त्या बाईकने फिरलो, ६० किलोमीटर एका लिटरला ती चालायची, ९.५० ते १० रूपये लिटर पेट्रोल होतं, त्या हिरो होंडाची माझी दोस्ती झाली होती, कधीही मी तिला पडू दिली नाही, खूप सावकाश आणि प्रेमाने चालवायचो, ती मी कोणालाही चालवायला द्यायचो नाही, दुसऱ्यांच्या बाईकची लोकांना कदर नसते.

मग ऍक्टर झाल्यावर चेहऱ्याची खूप काळजी घेण्यासाठी बाईक सोडली, त्या काळात ट्रक्स खूप काळा धूर सोडायचे, चेहरा पूर्ण काळा पडायचा, हेल्मेट मुळे केसांची स्टाईल खराब व्हायची, मग काय मग गाडी घेण्याचं वेड लागलं, पण bike चं वेड काही कमी होत नाही आहे. शेवटी वेडचं ते. काल धवलने त्याची bike मला चालवायला दिली. आणि पुन्हा ते मनात त्या ईच्छा निर्माण झाल्या”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “काही दिवसांनी असे लोक रस्त्यावर सेक्स करतील”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्याची कमेंट, उत्तर देत म्हणाली “स्त्रियांबद्दल…”

दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यामुळेच ते घराघरात पोहोचले.