छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायमच चर्चेत असते. या मालिकेत सर्वच कलाकार हे प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा अभिनेते मिलिंद गवळी साकारताना दिसत आहेत. नुकतंच त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण कसे केले, याचा किस्सा सांगितला आहे.
मिलिंद गवळी हे इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आणि शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या आहेत.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”
मिलिंद गवळी यांची पोस्ट
मैं अकेला चलता गया और कारवा बनता गया !
मी आठवीत शारदाश्रम विद्यामंदिर दादर या शाळेत असताना , कोणीतरी मला सांगितलं की फिल्म दिविजन मध्ये एका बाल चित्रपटाचं कास्तींग चालू आहे , आणि मला चांगलं आठवतं की 63 नंबरची b.e.s.t ची बस पकडून मी जसलोक हॉस्पिटल च्या समोर फिल्म्स डिव्हिजन च्या ऑफिस मध्ये पोहोचलो, इथे दोन माणसं ऑडिशन घेत होती, त्यांनी मला आत studioत बोलवलं आणि काही प्रश्न विचारले, नाव काय? पत्ता काय?राहतोस कुठे? आई वडील काय करतात? आणि यापूर्वी एक्टिंगचा काही अनुभव आहे का?मी त्यांना सांगितलं हो आहे ! एका नाटकात मी काम केलं होतं! ते खोटं बोलणं माझ्या अंगाशी आलं, कारण लगेचच ते दोघ एकदमच म्हणाले, काहीतरी परफॉर्म करून दाखव. झाली ना माझी पंचायत! मी पण दीड शहाणा होतोच, जिद्दी ही होतोच, तिथल्या तिथे एक नाटकाचा सिन डोक्यात तयार केला आणि बोलायला सुरुवात केली, माझा परफॉर्मन्स बघून त्यांना नक्कीच कळलं असणार की हा थापा मारतो आहे.
तेव्हाच मला ही कळलं होतं की मला काही हे लोक कास्ट करणार नाहीत. पण तो सगळा प्रवास, ती जर्नी मला सुखावून गेली, ते film divisionच Office, इथे लागलेले पोस्टर्स, STUDIO ambience. या सगळ्यांनी मी भारावूनच गेलो होतो, मला हे विश्व स्वप्नावत वाटत होतं. माझ्या शाळेत ल्या मित्रांचं आधीच ठरलं होतं ते मोठे झाल्यावर ते काय बनणार आहेत, जयंत कारेकर डॉक्टर, रमेश महाडीक इंजीनियर, रमाकांत घनाते चार्टर्ड अकाउंटेंट, एकदा मला माझ्या शाळेतल्या मित्रांनी विचारलं , मिल्या तू मोठा झाल्यावर काय होणार आहेस ? तू काही ठरवलं आहेस का? आणि मी सेकंड थॉट न देता उत्तर दिलं होतं , की मला ॲक्टर Actor होणार आहे !
ते सगळेच हसले होते, माझे चेष्टा केली होती , पण मी पक्का निश्चय केला होता . आपण अभिनेताच व्हायचं. यानंतर मी कोणालाही कधीही सांगितलं नाही की मला अभिनेता व्हायचं आहे. पण मनामध्ये दृढ निश्चय केला होता, हा प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे हेही मला माहित होतं, म्हणूनच म्हटलं, “मैं अकेला चलता गया और कारवा बनता है “ आज माझ्या या कारवांमध्ये माझ्याबरोबर प्रवास करायला पहाटे साडेतीन वाजता पुण्याहून ठाण्यात आलेली हि मंडळी शितल, मिहीर , गौरव, सिद्धार्थ, असे मिलिंद गवळी यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”
दरम्यान मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. त्यावर अनेकांनी तुम्ही खूप छान दिसताय, असे म्हटले आहे. तर काहींनी त्यांच्या हसण्याचे कौतुक केले आहे. सध्या त्यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.