छोट्या पडद्यावरील अनेक रिअॅलिटी शो हे घराघरात प्रसिद्ध असतात. सोनी टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ हा कार्यक्रम सध्या लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध डान्सर शिवम वानखेडे सहभागी झाला आहे. नुकतंच अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्याच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात शिवम वानखेडे हा त्याला डान्स शिकवताना दिसत आहे. या व्हिडीओ स्टार प्रवाह कार्यक्रमापूर्वीच्या डान्स सरावावेळीचा आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी शिवमचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : “…बस इतकेच”, सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, म्हणाला “रवी जाधव तुझ्या…”

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“शिवम वानखडे “मूर्ती लहान कीर्ती महान”. शिवम हा उत्कृष्ट डांसर आहे, डान्स कोरिओग्राफर वैभव घुगे यांना शिवम associate करतो, आणि पहिल्यांदा स्टार प्रवाहच्या कार्यक्रमांमध्ये डान्स करण्यासाठी माझी निवड झाली, याचं मला खूप आश्चर्य वाटलं होतं आणि भीती सुद्धा वाटली होती.

मी वैभव घुगे यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की डान्सचा आणि माझा बरेच वर्षापासूनचा घोळ आहे तर माझ्या ऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी कृपया घ्या, वैभव मला म्हणाले की मी तो डान्स कोरिओग्राफ केलेला आहे. शिवम वानखडे तो तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला तो जमणार नाही तर मग आम्ही दुसर्या कोणाला तरी घेऊ, शिवम ने मला इतक्या साध्या सरळ सोप्या पद्धतीने तो डान्स शिकवला, माझा कॉन्फिडन्स वाढवला, आणि मी त्यानंतर तो परफॉर्मन्स केला, माझं कौतुक ही झालं, या डान्स सिरीयल करत असताना मला एक गोष्ट सातत्याने जाणवत होती की शिवम हा अतिशय तयारीचा डान्सर आहे, त्याची लवचिकता आणि सहजता आधी वाखण्याजोगी आहे.

एका महिन्यापूर्वी शिवमचे वडील वारले, आणि त्यावेळेला तो Sony tv च्या डान्स रियालिटी शो India’s Best dancer, मध्ये त्याचा सहभाग होता, आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या दु:खद घटनेनंतर ही शिवम तिसऱ्या दिवशी परत त्या डान्सच्या रियालिटी शोमध्ये पुन्हा उभा राहिला, अगदी जगावेगळा मातीच्या घडलेल्या असतात या शिवमसारख्या मुर्त्या, म्हणूनच मी त्याला म्हणतो की मूर्ती लहान आणि कीर्ती महान.

शिवम चा एक एक परफॉर्मन्स बघून माणसाला थक्क व्हायला होतं, इतके कष्ट इतकी प्रॅक्टिस इतकी मेहनत, आणि मनाची स्थिती ही अशी असताना ज्या वेळेला माणूस जिद्दीने मेहनत करतो त्यावेळेला खरंच त्या व्यक्तीला सलामच करावसं वाटतं. मला स्वतःला अभिमान वाटतो की मला या अशा व्यक्तींबरोबर काम करायची संधी मिळाली आहे.

शिवमच्या पुढच्या प्रवासासाठी माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा आणि आशीर्वाद, आणि नक्कीच तो त्याच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार. शरीराने जरी आज त्याचे वडील त्याच्याबरोबर नसले तरी मनाने ते सदैव त्याच्याबरोबर असणार आहेत आणि त्याला शुभ आशीर्वाद देतच राहणार आहेत”, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.

आणखी वाचा : …म्हणून अक्षय कुमारने स्वीकारलेलं कॅनेडियन नागरिकत्व, स्वत:च खुलासा करत म्हणाला “माझे चित्रपट आपटले अन्…”

दरम्यान मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर शिवम वानखेडेनेही प्रतिक्रिया दिली आहे. खूप खूप धन्यवाद सर, माझ्यासाठी तुमचे हे शब्द फार मोलाचे आहेत. मला तुम्ही कायमच आवडता, असे शिवमने या पोस्टवर कमेंट करताना म्हटले आहे.

Story img Loader