‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. मिलिंद यांनी अनिरुद्ध भूमिका उत्तमरित्या साकारली असून प्रेक्षकांचं त्यांना भरभरून प्रेम मिळत आहे. पण अनिरुद्ध भूमिका स्वीकारण्यामागच्या खऱ्या कारणाचा खुलासा मिलिंद गवळी यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद होणार का? अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले…

हेही वाचा – ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर डान्स रील्समुळे ट्रोल; अभिनेत्रीने सुनावले खडे बोल

‘लोकसत्ता ९९९’ या कार्यक्रमात अभिनेते मिलिंद गवळी आणि अभिनेत्री रुपाली भोसले हे दोघं सहभागी झाले होते. यावेळी मिलिंद गवळी यांनी अनिरुद्ध ही भूमिका का स्वाकारली? याचं खरं कारण सांगितलं आहे. ते म्हणाले, “मला ही भूमिका करायला फार उत्साह नव्हता. मी सिनेमे करत होतो. पण माझे आठ सिनेमे तयार होऊन, सेन्सर होऊन प्रदर्शित झाले नाहीत. त्यामुळे माझं दोन-तीन वर्षांचं काम लोकांपर्यंत पोहोचलंच नाही. तसेच माझे नातेवाईक तू मालिका का करत नाही? मालिका रोज पाहता येतात. चित्रपट पाहता येते नाहीत. आम्ही चित्रपटगृहात जास्त जात नाही. काही नाशिकचे नातेवाईक म्हणाले, तुझे आमच्या इथे चित्रपट प्रदर्शितच होत नाहीत. हे सतत ऐकल्यामुळे माझ्या डोक्यात सुरू होतं की, आपण मालिका करूया. त्यामुळे आपलं लोकांना काम दिसेल. मग मी ‘तू अशी जवळी रहा’मध्ये कर्नल अजय सावंतची भूमिका केली. तो अगदी हिरो होता. खूप मज्जा आली. ती खूप भारी भूमिका होती. त्याच्यानंतर अनिरुद्ध देशमुख ही भूमिका माझ्याकडे आली. २५ वर्ष लग्नाला झालेली, त्याच्या ऑफिसमध्ये एक संजना नावाची मुलगी आहे. तिच्या तो प्रेमात पडतो. इथंपर्यंतची गोष्ट सांगण्यात आली होती. मी म्हटलं करू आणि आपल्या पद्धतीने करू.”

हेही वाचा – “…त्यानंतरच होकार दिला”, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना भूमिका स्वीकारण्यापूर्वी रुपाली भोसलेने केला होता ‘हा’ विचार

पुढे मिलिंद गवळी म्हणाले की, “पहिल्या दिवसांपासून मी नकारात्मक भूमिका म्हणून कामाला सुरुवात केली. पण नंतर करता करता माझ्या लक्षात आलं की, ही भूमिका नकारात्मक नाहीये. ज्या पद्धतीने तो मुलांबरोबर वावरतो, वडिलांचा ज्याप्रकारे आदर करतो, आईचा आदर करतो. तो कष्टाळू आहे. त्याच्या कामाच्याबाबतीत तो खूपच प्रामाणिक आहे. संजनाला तिच काम कसं बरोबर करायचं? त्याच्यातही तो तिला मदत करत असतो. मग मला लक्षात आलं की, अनिरुद्धमध्ये सकारात्मक बाजू खूप आहेत. त्याची फक्त एकच चूक झाली की, तो लग्न झाल्यानंतर ऑफिसलमधल्या हुशार, सुंदर अशा संजनाच्या प्रेमात पडला. पण हे प्रेम त्यानं स्वीकारलं. त्यामुळे माझ्यादृष्टीने अनिरुद्धची भूमिका नकारात्मक नाहीये. खरंतर तो हिरो आहे. कोणीतरी अशी भूमिका करायलाच पाहिजे होती. मालिकेत अनिरुद्ध हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण १२०० भागांमधून सर्व पुरुषांना कळलं असेल काय करू नये.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor milind gawali why accept anirudh role of aai kuthe kay karte serial pps
Show comments