‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजने प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडल्यानंतर तो झी मराठी वाहिनीवरील ‘फु बाई फु’ या कार्यक्रमात दिसला. मालिकांप्रमाणे नुकताच तो सरला एक कोटी’ चित्रपटात दिसला होता. आता तो पुन्हा एकदा मोठया पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
ओंकार भोजने आता दिग्दर्शक संजय जाधव यांच्या ‘कलावती’ या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे मराठीतले आघाडीचे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली, या निमिताने अभिनेत्याने माध्यमांशी बातचीत केली. तेव्हा त्याला विचारण्यात आले की “हास्यजत्रा सोडल्यानंतर एक एक तुझे चित्रपट येऊ लागले आहेत. हास्यजत्रा सोडणं हे अर्थाने लकी किंवा अनलकी ठरलं का?” त्यावर ओंकार असं म्हणाला, “या चर्चेत काहीच तथ्य नाही. त्या मंचामुळे मला ओळख मिळाली तर मी ते सोडल्यामुळे मला ते लकी कसं ठरेल? तेवढ्यावेळेपुरतं ते माझं काम होतं आणखी काही काम होती त्यासाठी मला निघावं लागलं. ती एक वेळी होती लकी, अनलकी या भानगडीत मी पडलो नाही.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
“त्यांचे चित्रपट…” अमृता खानविलकरबरोबर काम करण्याबाबत ओंकार भोजनेची प्रतिक्रिया चर्चेत
काही महिन्यांपूर्वी ओंकारने झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला. यामुळे अनेक चाहत्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती. हास्यजत्रा सोडण्यामागे ओंकारने स्पष्टीकरणदेखील दिले होते.
दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव हे ‘कलावती’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणार आहेत. तब्बल ४ वर्षांनी संजय जाधव यांचा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, हरिष दुधाणे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तर ओंकार भोजने, दीप्ती धोत्रे आणि युट्यूबर नील सालेकरही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.