अभिनेता प्रसाद ओक हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने त्याच्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांना कायमच भूरळ घातली आहे. प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला धर्मवीर हा चित्रपट चांगलाच हिट ठरला. या चित्रपटाने प्रसादला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. पण आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रसादने शेअर केलेला एक रिल व्हिडीओ पाहून त्याची पत्नी मंजिरी रागवल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रसाद ओकने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याला ‘एकजण आयुष्यात काय सुरु आहे’, असे विचारताना दिसत आहे. त्यावर प्रसाद ओक हा फक्त तोंड उघडून इशारे करत काहीतरी बोलत असल्याचे दिसत आहे. मात्र त्याचा आवाजच येत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “दिघे साहेबांची गोष्ट खोटी…” प्रसाद ओकचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
यानतंर समोरील व्यक्ती ‘भावा तू काय बोलतो, काही समजत नाही, असे म्हणते.’ त्यावर प्रसादही चिडून ‘तेच तर, मलादेखील काहीही समजत नाही’, असे म्हणतो. प्रसादने हा व्हिडीओ शेअर करत “कुछ समझ में नही आ रहा हैं” असे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “मला बेडरुमबाहेर झोपावं लागलं होतं, कारण ऐश्वर्या…” अभिषेक बच्चनने सांगितलेला ‘तो’ किस्सा
प्रसाद ओकचा हा व्हिडीओ पाहून मंजिरी ओक मात्र रागवल्याचे पाहायला मिळत आहे. मंजिरी त्याच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. “प्रसाद घरी ये मी समजावते. क्या हैं ज़िंदगी ..ठीके?” अशी मजेशीर कमेंट मंजिरीने केली आहे. तिची ही कमेंट वाचून अनेक जण जोरजोरात हसू लागले आहेत.
दरम्यान प्रसाद ओकच्या संपूर्ण प्रवासात त्याला त्याची पत्नी मंजिरी ओक हिने मोलाची साथ दिली आहे. ते दोघेही एकमेकांबद्दल सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. अनेकदा ते दोघेही एकमेकांबद्दल विविध रिल बनवताना दिसतात. त्यांचे हे रिल फारच हिट होतानाही पाहायला मिळते.