दरवर्षी प्रमाणे यंदाही जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ‘फादर्स डे’ साजरा केला जात आहे. वडिलांचं प्रेम, वात्सल्य, त्याग, वेदना याची जाणीव ही प्रत्येक मुलाला असते. त्यामुळे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. आज ‘फादर्स डे’ साजरा केला जात असून सर्वजण सोशल मीडियावर आपल्या वडिलांबरोबर फोटो शेअर करून त्यांच्याविषयी भरभरून लिहित आहेत. मराठी कलाकार मंडळींनी देखील ‘फादर्स डे’ निमित्ताने वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता प्रथमेश परबच्या भावुक पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथमेश परबने वडिलांचा सायकलवरचा व्हिडीओ शेअर करून खास पोस्ट शेअर केली आहे. “हॅप्पी फादर्स डे पप्पा…गेल्या काही वर्षांत खूप काही बदललं. वेगवेगळे सिनेमे, त्यातील भूमिका, कथा, तुम्हाला माणूस म्हणूनही घडवत असतात…चाळीमधून फ्लॅट सिस्टममध्ये शिफ्ट झालो, स्विफ्टची जागा क्रेटाने घेतली. जीवनशैलीत बदल होतं असला तरी काही गोष्टींची पाळंमुळं आपल्यात कायम रुजू द्यावी हे मात्र मी माझ्या बाबांकडून शिकतोय.”

हेही वाचा – Video: संजय दत्त पोहोचला बागेश्वर धामला, बालाजीचं दर्शन करून धीरेंद्र शास्त्रींचे घेतले आशीर्वाद, म्हणाला, “माझ्यासाठी आयुष्यातील…”

“गेली ३० ते ३५ वर्षे ते सायकल चालवतात. अजूनही ऑफिसला ते सायकलने जातात. काम करत रहावं, माणूस आपोआप फिट राहतो असं त्यांचं म्हणणं. बाबा, तुम्ही आयुष्यभर असेच फिट आणि आनंदी राहा याचं फादर्स डेच्या शुभेच्छा,” असं कॅप्शन पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे. हे सुंदर कॅप्शन प्रथमेशची बायको क्षितिजा घोसाळकर-परबने लिहिलं आहे.

हेही वाचा – ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार

हेही वाचा – संथ सुरुवात झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईत चांगली वाढ, कमावले ‘इतके’ कोटी

दरम्यान, अलीकडे ‘रेड एफएम मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्येही प्रथमेश परब वडिलांविषयी बोलला होता. तो म्हणाला होता, “माझी सायकल बरोबरची आठवण म्हणजे माझे बाबा. अजूनही सायकलवरच कामावर जातात, त्यामुळे अजूनही ते फिट आहेत. मला जेव्हा सायकलिंग शिकायची होती त्यावेळी मी बाबांकडूनच शिकलो. धडपडत, पडत शिकली. मी शाळेतही सायकलवरच जायचो.”

प्रथमेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच त्याचा ‘होय महाराजा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ३१ मेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अभिजीत चव्हाण, अंकिता लांडे, असे बरेच कलाकार मंडळी पाहायला मिळाले. याशिवाय प्रथमेश ‘ताजा खबर’ वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहे. अभिनेता भुवन बाम, श्रिया पिळगांवकर, महेश मांजरेकर अशा अनेक कलाकारांबरोबर प्रथमेशने ‘ताजा खबर सीझन २’मध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor prathamesh parab shares special post for father on fathers day pps