‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आजही घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजेच राज हंचनाळे. राजने या मालिकेत राणादाचा भाऊ हे पात्र साकारलं होतं. नुकतंच राजने एका मालिकेच्या शूटींगचा अनुभव सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज हंचनाळे हा सध्या सोनी मराठीवरील ‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेत झळकत आहे. यात तो अर्जुन हे पात्र साकारताना दिसत आहे. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत राज हा शूटींग करताना दिसत आहे. यावेळी त्याने शूटींग करताना किती धावपळ करावी लागते, याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “मी आतापर्यंत दिलेल्या मुलाखतींपैकी…” राज ठाकरेंनी सांगितला ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या शूटींगचा अनुभव

“30 सेकंदच्या कटसाठी संपुर्ण टीमला किती धावपळ , मेहनत करावी लागते आणि हे सर्व फक्त technical गोष्टीसाठी नाही तर आपल्या सोबतच्या कलाकाराला emotions साठी योग्य ते वातावरण निर्माण करण्यासाठी सुद्धा. खूप खूप आभार. टीम जिवाची होतिया काहिली. हा प्रवास असाच चालू राहो”, असे राज हंचनाळेने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : प्रसिद्ध के-पॉप गायिकेची आत्महत्या, हॉटेलच्या खोलीत आढळला मृतदेह, सुसाईड नोट सापडली

दरम्यान राजची ही पोस्ट पाहून अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. यातील अनेकांनी राजच्या पोस्टवर ‘खूपच सुंदर’, ‘छान’ असे म्हटले आहे. तर काहींनी त्याच्या या मेहनतीचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor raj hanchanale share video jivachi hotiya kahili shooting experience nrp