‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेत जान्हवीच्या भावाची म्हणजेच पिंट्याची भूमिका अभिनेता रोहन गुजरने साकारली होती. या मालिकेमुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. पुढे त्याने ‘बन पाव’, ‘लव्ह लग्न लोचा’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. सध्या रोहन सन मराठी वाहिनीवरीन ‘नवी जन्मेन मी…’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यात त्याची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण स्नेहल देशमुखबरोबर लग्नगाठ बांधली. रोहन व स्नेहल दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सध्या स्नेहलच्या इन्स्टाग्राम पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

रोहनची पत्नी स्नेहल देशमुख-गुजर गेल्या अनेक वर्षांपासून मार्केटिंग क्षेत्रात काम करते. अलीकडेच सोशल मीडिया पोस्ट शेअर करत स्नेहलने तिला कर्करोगाचं निदान झाल्याची माहिती दिली.

Success story of kokila who started wooden toy business at the age of 42 know earning lakhs her husband died due to cancer
कर्करोगामुळे पतीचा मृत्यू, तीन मुलांची जबाबदारी अन्…, वयाच्या ४२व्या वर्षी महिलेने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आता महिन्याला करतात लाखोंची कमाई
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
karnataka man suicide
Karnataka Suicide: ‘पत्नीने छळ केला’ म्हणत पतीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं,”तिला माझं मरण हवंय”!

हेही वाचा : “अक्कल पाजळण्यापेक्षा…”, नेटकऱ्याच्या कमेंटवर केतकी माटेगावकरचं स्पष्ट उत्तर, म्हणाली, “तुम्हाला…”

स्नेहल देशमुखची इन्स्टाग्राम पोस्ट

ऑगस्ट महिन्यात छातीत डाव्या बाजूला दुखणं सुरु झालं…हे दुखणं नवीन होतं…आधी कधीही अनुभवलं नव्हतं…पाठपुरावा करायचं ठरवलं आणि किचकट आजार surprise म्हणून समोर ठाकला…‘स्टेज झिरो कॅन्सर’ (Ductal carcinoma in situ)…कॅन्सरची आधीची स्टेज…

२ मॅमोग्राम, बायोप्सी, सोनोलोकोलायझेशन, ३ नोव्हेंबरला ब्रेस्ट कन्झर्वेशन (conservation) सर्जरी, आणि रेडिएशन अशा टप्प्यांतून उपचार सुरु आहेत…

ह्या आजाराने मला पूर्ण पकडण्याआधीच मी त्याला एक टप्पा आऊट करू शकले याचं समाधान आहे… मनाला आणि शरीराला गेल्या महिन्याभरात खूप सहन करावं लागलंय…अजूनही लागतंय… संपूर्ण प्रक्रियेत मेंटल, इमोशनल ब्रेक डाऊनचे अनेक प्रसंग येतात…मला डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा आणि surgery नंतर पहिल्यांदा जखम पाहिली तेव्हा डोळ्यांना थांबवता नाही आलं…पण जखमांकडे, स्वतःच्या शरीराविषयी जागरूक असल्याची, या प्रसंगाला छान सामोरं गेल्याची खूण म्हणून पाहिलं की गोष्टी सोप्या होतात… त्या अजून सोप्या होतात जेव्हा तुमचं कुटुंब तुमच्यासोबत खंबीरपणे उभं राहतं…या बाबतीत माहेर आणि सासर दोन्ही कुटुंबांना १०० गुण…कोणताच ड्रामा नाही, साध्या सोप्या पद्धतीने आहे ते accept केलं आणि वातावरण पूर्णपणे नॅार्मल ठेवलं….

“मीच का? माझ्यासोबतच का?” असे प्रश्न कटाक्षाने टाळायला हवेत… सहानुभूतीचा मोह आवरायलाच हवा… तरच विचारांत धैर्य, भावनांत स्थैर्य येऊ शकतं…’दिसतं तेच वास्तव’ या पलीकडे जाऊन आयुष्याचा विचार सुरु झालाय…

या सगळ्या काळात जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे या आजाराविषयी जीवघेणा आजार म्हणून जितकं अवडंबर माजवलं जातंय तेवढी जनजागृती नाही… अजूनही या विषयी सांगणं/ बोलणं आपण टाळतो… मुली/ महिला मॅमोग्राम करणं टाळतात, हे करणं का गरजेचं आहे त्या विषयीचा awareness कमी पडतोय… हा आजार अनुवंशिक ही असू शकतो हे मला या process मध्येच कळलं… पण त्या पलीकडेही हे बदलत्या जीवनपद्धतीचं, अवाजवी stress चं प्रतिबिंब आहे… हे विसरता काम नये…तणावापासून स्वतःला दूर ठेवणं ही तुम्ही स्वतःसाठी, आयुष्याप्रती दाखवलेली basic कृतज्ञता असेल…मीही अजून हे शिकतेचं आहे…

दसरा ते दिवाळी या १५ दिवसांत शरीरातून ही कॅन्सरची नकारात्मकता काढून टाकलेय… यंदा दिवाळीत योगायोगाने खूप दिवे गिफ्ट मिळाले… मी ते ‘तिमिरातून तेजाकडे’ याचं प्रतिक मानलेत… Radiation starts today

हेही वाचा : “एखाद्या स्त्रीला स्वत:चं मूल नसणं…”, ‘झिम्मा २’च्या कथेबद्दल हेमंत ढोमेने मांडलं मत, म्हणाला, “संवेदनशील विषय…”

दरम्यान, स्नेहल देशमुखच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच या सगळ्या कठीण प्रसंगात रोहन सुद्धा पत्नीला खंबीरपणे साथ देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Story img Loader