छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून सागर कारंडेला ओळखले जाते. सागर कारंडे हा सध्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. मात्र २० नोव्हेंबरला सागरची तब्येत बिघडल्याने शेवटच्या क्षणी प्रयोग रद्द करण्यात आला. यानंतर सागर कारंडेच्या तब्येतीबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. नुकतंच त्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

सागर कारंडे हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. सागरने नुकतंच एका फेसबुक लाईव्हद्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी त्याने रविवारी २० नोव्हेंबरला नेमकं काय घडलं? याबद्दल सांगितले आहे. गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघात ‘प्रभु प्रभात’ मासिकाच्या शताब्दीनिमित्त ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. मात्र त्याच दिवशी नाटकातील प्रमुख कलाकार सागर कारंडे याची तब्येत बिघडली. शेवटच्या क्षणी प्रयोग रद्द करणे शक्य नव्हते. त्यानंतर अचानक सूत्रधार गोटय़ा सावंत यांनी फोनाफोनी करून ‘अभिजात’ संस्थेच्या ‘वासूची सासू’ या नाटकाचा प्रयोग होईल, असे जाहीर केले. हा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला.
आणखी वाचा : चट मंगनी पट ब्याह! …अन् अवघ्या पावणे दोन वर्षात मोडणार मानसी नाईकचा संसार

Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
thane Bhiwandi attempt to murder
ठाणे: सिगारेट मागितली म्हणून हत्येचा प्रयत्न
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
Constant changes in the states climate But wait for the winter
राज्यात थंडीची प्रतिक्षाच! पाऊस मात्र…
Video : सायकलवरील ताबा सुटल्याने तरूणाचा मृत्यू
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…

सागर कारंडे फेसबुक लाईव्हमध्ये काय म्हणाला?

“गेल्या रविवारी २० नोव्हेंबरला ‘हीच तर फॅमिलीची गंमत’ या आमच्या नाटकाचा प्रयोग होता. संध्याकाळी ४ वाजता साहित्य संघला हा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. पण तेव्हा अचानक मला छातीत त्रास व्हायला लागला. छातीत दुखू लागले. त्यावेळी मला चक्करही आली. दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर मी रुग्णालयात गेलो. तिकडे माझ्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. तिकडून मी प्रयोगला जाणार होतो. माझी रक्त चाचणी, ईसीजी यासारख्या चाचण्या करण्यात आल्या. याचे रिपोर्ट नॉर्मल आले. पण चेकअप वैगरे झाल्यानंतर मला डॉक्टरांनी प्रयोग करण्यास किंवा प्रवास करण्यास मनाई केली होती. त्यामुळे तो प्रयोग रद्द करण्यात आला.

पण सुदैवाने ‘वासूची सासू’ची टीम त्याठिकाणी उभी राहिली आणि सर्व टीमचे खूप खूप आभार. कारण तो प्रयोग कॅन्सल न होता दुसरा प्रयोग का होईना तो झाला. मला अनेक दिग्दर्शक, कलाकार आणि निर्माते यांचे आभार. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. नाटकं पुन्हा होऊ शकतं, असेही ते म्हणाले.

छातीत दुखण्यामागचे कारण काय असू शकते याच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. दिवसातून चार ते पाच वेळा ईसीजी करण्यात येत होतं. तसेच २ डी इको एक ठराविक चाचणी असते तीही करण्यात आली. हे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले. त्यानंतर डॉक्टरांनी गेल्या काही दिवसात माझ्या कामाबद्दल चौकशी केली. तर गेला आठवडाभर मी प्रवास करत होतो. रात्री शूटींग, नाटकाचे प्रयोग, प्रवास, जेवण वेळेवर नव्हतं, त्यादिवशी मी काही खाल्लं नसल्याने अॅसिडीटी झाली. अॅसिडीटी वाढल्याने छातीत दुखत होतं, असं डॉक्टरांनी मला सांगितलं.

कालही माझी एक चाचणी करण्यात आली. त्याचेही रिपोर्ट नॉर्मल आहेत. आताही एका चाचणीसाठी जायचं आहे. डॉक्टरांनी नुकतंच मला डिस्चार्ज दिलाय. पण मी ठणठणीत आहे. मी तुमच्याशी बोलतोय याचा अर्थ मी बरा आहे. मला काहीही झालेले नाही”, असे सागर कारंडेने यावेळी म्हटले.

आणखी वाचा : “ड्रग्ज ॲडिक्ट पण मीच…” ‘आई कुठे काय करते’मधील ‘अनिरुद्ध’च्या पोस्टने वेधले लक्ष

दरम्यान सध्या सागर कारंडे सध्या चला हवा येऊ द्या या शो व्यतिरिक्त ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ आणि ‘इशारो इशारो में’ या नाटकात काम करताना दिसतो आहे. नाटकांच्या प्रयोगांमुळे त्याने ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम शो सोडला असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. मात्र त्यादरम्यान त्याने स्पष्टीकरण दिले होते.