मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. अनेक विषयांवर ते भाष्य करत असतात. नुकतंच मराठी अभिनेता समीर खांडेकरने मराठी भाषेतील सूचनेबद्दल रेल्वे प्रशासनाला जाब विचारला आहे. याबद्दल तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
एखाद्या विमानाप्रमाणे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज ‘तेजस एक्सप्रेस’ची नेहमीच चर्चा होत असते. याच ‘तेजस एक्सप्रेस’मध्ये माय मराठीची गळचेपी होत असल्याचे समीर खांडेकरने सांगितले आहे. यावेळी त्याने एक पोस्टही शेअर केली आहे.
आणखी वाचा : “चित्रपटगृहाने वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाही तर…” राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
समीर खांडेकरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ‘तेजस एक्सप्रेस’मध्येही सूचना सांगणाऱ्या एका डिजीटल बोर्डचे फोटो पोस्ट केले आहेत. ‘तुमची आपल्या वस्तू एका बाजूला ठेवू नये.’ ‘कृपया आपल्या जोडीदारावर लक्ष ठेवावे.’ ‘कृपया चालू गाडीमध्ये चडू नये.’ ‘ही रेल्वे छ. शिवाजी महाराज स्टेशन वासून मडगांव स्टेशन पर्यंत जाणार आहे.’ ‘तुमच्या प्रवास सुखाचा आणि सोयीची हो ही भारतीय रेल्वेची शुभेच्छा,’ असे यात म्हटले आहे.
“आम्ही Dome मधून बाहेर बघण्यातच रमलेलो असतो. प्रिय, इंडियन रेल्वे, मराठी माध्यमातल्या ४ थीतल्या मुलांकडून लिहून घेतलं असतं, तरी चाललं असतं! या सूचना ज्यांनी कुणी लिहिल्या आहेत त्यांना दंडवत. कृपया, वेळीच त्यात बदल करा”, असे समीर खांडेकरने म्हटले आहे.
मराठी अभिनेता समीर खांडेकरने याबद्दल संताप व्यक्त केला आहे. “मित्र/ मैत्रीणींनो खूप लाइक्स आणि फॉलोअर्स मिळावेत म्हणून हा व्हिडिओ पोस्ट नाही केलाय. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी संबधीत हॅंडलला ट्वीट करुन या Tejas Express मधल्या चुकीच्या ‘मराठी सूचनांची’ दखल घ्यायला भाग पाडा”, असेही आवाहन म्हटले आहे.
दरम्यान, समीर खांडेकरने मराठी मालिका, चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने ‘वैजू नंबर वन’ ही मालिकाही प्रचंड गाजली होती.