‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील नुकताच ‘ढोलकीच्या तालावर’ या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. नेहा पाटील या लावण्यावंतीने यंदाच्या ‘ढोलकीच्या तालावर’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आता यानंतर ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ हे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या पर्वात जुनी गाणी नव्या सुरात आणि वेगळ्या अंदाजात ऐकायला मिळणार आहेत. ७ ऑक्टोबरपासून रात्री ९ वाजता ‘सूर नवा ध्यास नवा’चे नवे पर्व प्रक्षेपित होणार आहे. या नव्या पर्वात मालिकाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेता स्पर्धक म्हणून सहभाग घेणार असल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – केतकी माटेगावकरचं पहिलं लग्न कोणाबरोबर झालंय? जाणून घ्या…

‘गोठ’ या लोकप्रिय मालिकेतील विलास, तर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता समीर परांजपे आता गायक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’च्या या नव्या पर्वात तो स्पर्धक म्हणून सहभाग घेणार आहे. याचा व्हिडीओ त्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेता समीर परांजपेने हा व्हिडीओ शेअर करत लिहीलं आहे की, “येतोय पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला.. पण यावेळी अभिनेता म्हणून नाही..गायक म्हणून सूर “नवा” ध्यास “नवा”… ७ ऑक्टोबर पासून शनिवार रविवार रात्री ९ वाजता आपल्या ‘कलर्स मराठीवर’…”

हेही वाचा – “भर पार्टीत शाहरुख खानने माझा हात धरला अन्…” गिरीजा ओकने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली…

हेही वाचा – “चॅनेल माझ्या पाठीशी आहे, तुझ्या?” ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानचा राज हंचनाळेला प्रश्न, अभिनेता उत्तर देत म्हणाला…

समीरने ही दिलेली आनंदाची बातमी पाहून चाहत्यांसह कलाकार मंडळी त्याला शुभेच्छा देत आहेत. “आमचा सुपरस्टार परतला”, “ऑल द बेस्ट, तुला पुन्हा पाहून खूप आनंद झाला,” “तुला ऑनस्क्रीन पुन्हा पाहण्यासाठी प्रतिक्षा करू शकतं नाही,” अशा प्रतिक्रिया चाहते मंडळी देत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sameer paranjape participants in sur nava dhyas nava new season pps