प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनानंतर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

संकर्षण कऱ्हाडेने इन्स्टाग्रामवर एक ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबर त्याने त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत एक पोस्टही शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
आणखी वाचा : “तू स्वत:वर ती वेळ…”, अशोक सराफ यांनी निवेदिता यांना दिला ‘हा’ कानमंत्र

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
delivery boy
“डिलिव्हरी बॉयचा संघर्ष कधीच कुणाला दिसत नाही!” VIDEO होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले ” डिलिव्हरी बॉयचा आदर करा”
Navjot Singh Sidhu
“अर्चना पूरन सिंगच्या जागी मी पुन्हा यावं…” नवज्योत सिंग सिद्धूंचे वक्तव्य; कपिल शर्मा शोमध्ये परतणार का?
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”

संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

“बाबा महाराज सातारकर, फार वाटायचं कधीतरी तुमच्या समोर बसुन, प्रत्यक्ष तुम्हाला पहात, तुमचा अभंग, किर्तन, प्रवचन ऐकावं.. आता ती संधी नाही…. गळा भरून भरून आलाय..

माझ्या लहानपणी बाबांनी नवीन कॅसेट प्लेअर आणला होता.. त्यावर लावलेली पहिली कॅसेट बाबा महाराजांची “आम्ही दैवाचे दैवाचे”. ती ऐकतांना पहिल्यांदा मला “तुकोब्बा , नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि “रूक्मीणी पांडूरंग” ह्यांची बाबा महाराजांच्या गोड आवाजांत “दास पंढरी रायांचे” हे ऐकत ओळख झाली ..

आजी आजोबांनी अनेक वर्षं वारी केली.. चातुर्मासात चारही महिने पंढरपूरी मुक्कामी असायचे.. आल्यावर आजी म्हणायची; “
“काय सांगू तुम्हाला पोरांनो ; बाबा महाराज प्रवचनात बोलतांना त्यांच्या तोंडातून शब्दं मोत्यांसारखे बाहेर पडतात आणि डोळ्यांत माणिक चमकतांत “ .. हे वर्णन ऐकून त्यांचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. तोच चेहरा डोळ्यासमोर आणुन रोज सकाळी त्यांच्या आवाजांत हरिपाठातल्या “बहुत् सुकृताची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी” हे ऐकतांना कित्ती गोड वाटतं काय सांगू ..?

प्रवचन करतांना एखाद्या वाक्यानंतर, “काय ….?” किंवा किर्तनात अभंग गातांना लय वाढवण्यासाठी केलेलं “हं हं हं हं” हे आपल्याला प्रत्येक क्षणाला गुंतवून ठेवतं , ठेवत राहील !! मला आजवर वारीला जाण्याचं भाग्यं नाही लाभलं पण , बाबा महाराजांनी मला आणि माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्या आवाजानी , स्वरांनी, श्रवणाने वारकरी केलंय..

आज ते आपल्यातनं गेले पण मी तरी ह्या जगांत आहे तोवर रोजची सकाळ त्यांच्या आवाजातल्या हरिपाठानेच सुरू करीन !
आज बाबा महाराजांना भेटून साक्षात परमेश्वर पण त्यांच्याच आवाजांत ऐकुन पाठ केलेला अभंग म्हणत असेल ; ..
“धन्य आजी दिन संत दर्शनाचा , अनंता जन्मीचा शीण गेला”, असे संकर्षण कऱ्हाडेने म्हटले आहे.

आणखी वाचा : “तेजस्विनी पंडित स्वाभिमानी, सोनाली कुलकर्णी उत्तम अभिनेत्री, तर सई ताम्हणकर…”; सिद्धार्थ जाधवचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

दरम्यान ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक वर्तुळातूनही शोक व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राला प्रदीर्घ अशी कीर्तनाची व ख्यातनाम कीर्तनकारांची परंपरा राहिली आहे. वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार फड म्हणून सातारकर घराण्याच्या फडाचं नाव मानानं घेतलं जातं असे. गेल्या चार पिढ्यांपासून सातारकरांच्या घरात प्रवचन आणि कीर्तनाची परंपरा होती. स्वत: बाबा महाराज सातारकरांनीही ही परंपरा मोठ्या अभिमानाने जपली आणि वाढवली होती. आता त्यांच्या कन्या ह. भ. प. भगवती महाराज ही परंपरा पुढे चालवत आहेत.