सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांची मुलं हे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळतात. तर काही कलाकार मंडळी मात्र याला अपवाद ठरताना पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मात्र शरद पोंक्षेंची लेक सिद्धी ही वैमानिक झाली आहे. नुकतंच त्यांनी पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली.

शरद पोंक्षे यांनी यांची मुलगी सिद्धी वैमानिक होण्याचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली होती. आता नुकतंच तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच ती वैमानिकही झाली आहे. नुकतंच शरद पोंक्षे यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “पुरूषांची जात…”, मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी सोनाली कुलकर्णीची संतप्त पोस्ट, म्हणाली…

ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
EY Ex Employee Exposed
EY Exposed : “४०० इमेल्स पाठवले, पण तरीही प्रमाणपत्र दिले नाहीत”, EY च्या माजी कर्मचाऱ्याचा खुलासा; म्हणाले…
Fake blood donation by bjp leader
भाजपा नेत्याची चमकोगिरी; मोदींच्या वाढदिवसानिमित्त केलं बोगस रक्तदान, व्हिडीओ व्हायरल होताच म्हणाले…
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
sebi fined rs 650 crore to 22 companies including anil ambani part 2
अबब भयंकर शिक्षा ! (भाग २)
Mamata Banarjee Meet to Protesters
Mamata Banerjee : ममता बॅनर्जी आल्या, दोन तास थांबल्या, पण कोणीही आले नाही; कोलकाता बलात्कार प्रकरणी आंदोलकांची आजची बैठकही निष्फळ!
Vinesh Phogat slams PT Usha
Vinesh Phogat on PT Usha: “पीटी उषा यांनी गुपचूप फोटो घेतला आणि त्यानंतर राजकारण…”, विनेश फोगटचा मोठा आरोप

“कु सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत.कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी.मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे.करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा”, असे शरद पोंक्षेंनी म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला रामराम केल्यानंतर शरद पोंक्षे दिसणार नव्या भूमिकेत, पहिली झलक समोर

दरम्यान सिद्धीने यशाची ही पायरी चढल्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धी पोंक्षे ही लहानपणापासूनच शालेय शिक्षणात हुशार होती. बारावीमध्ये असताना तिने विज्ञान शाखेत ८७ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर आता सिद्धीही वैमानिक झाली आहे.