स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी. ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे नेते होते. हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. लहानपणापासूनच त्यांना देशप्रमाची आवड होती. देशासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेतेमंडळी आणि कलाकार त्यांना विनम्र अभिवादन करत आहेत. नुकतंच अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेअर करत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केले आहे.
मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्हीही माध्यमांवर ठसा उमटवणारे अभिनेते म्हणून शरद पोंक्षेंना ओळखले जाते. ते कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. ते विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतात. शरद पोंक्षे यांना कट्टर सावरकरवादी म्हणून ओळखले जाते. ते कायम त्यांचे विचार सोशल मीडियाद्वारे मांडताना दिसतात. नुकतंच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “मला निवडणूक…” मनसेचा प्रचार ते राजकारण; शिव ठाकरेने मांडले स्पष्ट मत
यात त्यांनी एका जुन्या वृत्तपत्राचा फोटो शेअर केला आहे. या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर यांचे स्वर्गारोहण!’ अशा मथळ्याखाली असलेली बातमी पाहायला मिळत आहे. याबरोबरच शरद पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एक चित्रही शेअर केले आहे. “आज विश्वरत्न स्वा सावरकरांची पुण्यतिथी. स्वतंत्र भारतात जिवंत समाधी घेणारे शेवटचे युगपुरुष .विनम्र अभिवादन”, असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे.
आणखी वाचा : “सातत्यानं सावरकर व्याख्यानं देतोय पण…” शरद पोंक्षेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
त्यांच्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट करत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केले आहे. ‘कोटी कोटी प्रणाम’, ‘विश्वरत्न सावरकर’, ‘विनम्र अभिवादन’, अशा अनेक कमेंट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पोस्टखाली पाहायला मिळत आहे.