स्टार प्रवाह वाहिनीवर ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सुप्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. या मालिकेच्या निमित्ताने एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. यात कानिटकर कुटुंब दाखवण्यात आले आहे. या मालिकेत दादा काका या पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केले होते. अभिनेते शरद पोंक्षे यांनी ही भूमिका साकारली होती. मात्र आता त्यांनी या भूमिकेला रामराम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याच मालिकेबद्दल आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या मालिकेतून शरद पोंक्षे यांनी काढता पाय घेतला आहे. नुकतंच स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
आणखी वाचा : केदार शिंदेंचा ‘तो’ फोन, कर्करोग अन्…, शरद पोंक्षेंनी केला ‘बाईपण भारी देवा’मधील भूमिकेबद्दल खुलासा; म्हणाले “मला कोणीही…”

शरद पोंक्षे काय म्हणाले?

“गेली दोन वर्ष स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ही माझी मालिका चालू होती. त्यात मी विनायक कानिटकर हे पात्र साकारत होतो. पण काही कारणांमुळे आणि पुढे घेतलेल्या काही प्रोजेक्टमुळे मी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेसाठी फारसा वेळ देऊ शकणार नाही.

माझ्यामुळे त्या मालिकेचे नुकसान होऊ नये म्हणून ५०० भाग पूर्ण झाल्यावर मी ती मालिका सोडलेली आहे. माझ्या जागी माझा अत्यंत जवळचा मित्र आणि उत्तम अभिनेता उदय टिकेकर हे तुम्हाला विनायक कानिटकर ही भूमिका साकारताना दिसतील. तुम्ही मला जसं प्रेम दिलंत तसंच प्रेम उदय आणि त्याच्या व्यक्तीरेखेलाही द्याल अशी मला खात्री आहे. पुन्हा नवीन एखाद्या मालिकेतून किंवा नाटकातून भेटू”, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

दरम्यान शरद पोंक्षेनी अचानक मालिका सोडल्याने त्यांचा चाहता वर्ग नाराज झाला आहे. शरद पोंक्षेंच्या ऐवजी उदय टिकेकर या मालिकेत विनायक कानिटकर म्हणजे दादा काका ही भूमिका साकारणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sharad ponkshe took exit from thipkyanchi rangoli serial know the reason behind nrp
Show comments