‘होणार सून मी ह्या घरची’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘पाहिले ना मी तुला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकरने प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाने अढळ स्थान निर्माण केलं आहे. शशांकने आता मराठीसह हिंदीत आपल्या अभिनयाचा ठसा उमवटला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तेलगी स्कॅम २००३’ (Scam 2003) या वेब सीरिजनंतर करण जोहरच्या ‘शोटाइम’ या वेब सीरिजमध्ये शशांक झळकला. या सीरिजमध्ये शशांकने इमरान हाश्मीबरोबर काम केलं. असा हा प्रसिद्ध अभिनेता बऱ्याच महिन्यांना पत्नी व मुलासह पुण्याच्या घरी गेला आणि सालपापडीवर ताव मारला. याचा व्हिडीओ शशांकने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रींचा ऑस्ट्रेलियात ‘नाच गं घुमा’, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “एकदम कडक…”

शशांक हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असतो. तसेच दैनंदिन जीवनातले अनुभव देखील सांगत असतो. शिवाय इन्स्टाग्राम स्टोरीवर परखड मत व्यक्त करत असतो. नुकताच शशांकने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो सालपापडीवर ताव मारताना दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करत शशांकने लिहिलं आहे, “काल खूप महिन्यांनी पुण्याला घरी गेलो होतो. अगदी लहानपणापासून आवडीचा पदार्थ म्हणजे, सालपापडी. आईकडे किंवा आजीकडे कधी सांगितलं केली की त्या नेहमी म्हणायच्या, उन्हाळ्यात करेन. काल तो योग आला! मी, प्रियांका व ऋग्वेद येतोय म्हटल्यावर आईने ३ दिवस आधी तांदूळ भिजवले आणि आमच्यासाठी सालपापड्या केल्या. शिल्पा केतकर, शिरीष केतकर, दीक्षा केतकर, नचिकेत गुट्टीकर, प्रियांका केतकर, ऋग्वेद आणि मी सगळ्यांनी मिळून अक्षरशः एका बैठकीत सगळं पीठ संपवलं. तुम्हाला आवडते का सालपापडी ? तुम्ही काय म्हणता? सालपापडी की फेण्या ? की आणखी काही? “

शशांकच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “सातारामध्ये सालपापडी म्हणतात…पण मला कुरडई, पोहे पापड खूपच आवडतात..त्या बरोबर साबुदाणाच्या चिकवड्या पण”. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “याला आम्ही फेण्या म्हणतो”. तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “भयंकर आवडतात सालपापडी.”

हेही वाचा – Video: आलिया भट्ट-रणबीर कपूरने वांद्रे येथील नव्या आलिशान घराची केली पाहणी, किंमत वाचून व्हाल थक्क

दरम्यान, शशांक सध्या ‘मुरांबा’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. शशांकची ही मालिका देखील प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. या मालिकेत त्याने साकारलेल्या अक्षय मुकादमच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor shashank ketkar after many months went to pune home with his wife and son video viral pps