मराठी अभिनेता शशांक केतकर हा कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. शशांक केतकर हा सध्या ‘मुरांबा’ या मालिकेत झळकत आहे. त्याबरोबरच तो ‘स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी’ या वेबसीरिजमुळेही चर्चेत आहे. नुकतंच शशांक केतकरने जेवण बनवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
शशांक केतकर हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच शशांकने पास्ता बनवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पास्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य दिसत आहे. यात बेबी कॉर्न, ब्रोकोली, ऑलिव्ह यांसारख्या अनेक भाज्या दिसत आहेत.
आणखी वाचा : शशांक केतकरच्या पत्नीने शेअर केला शाहरुख खानसोबतचा ‘तो’ फोटो, नेटकरी म्हणाले “तुझा नवरा…”
त्याने पास्ता शिजवून त्यात सर्व भाज्या एकत्र केल्या आहेत. त्यानंतर त्याने काही सॉस मिसळत छान व्हाईट सॉस पास्ता बनवताना दिसत आहे. या व्हिडीओला शशांकने हटके कॅप्शन दिले आहे. “जेवण बनवल्याने माझं मन शांत होतं”, असे शशांकने कॅप्शन देताना म्हटलं आहे.
आणखी वाचा : “मराठी कलाकार एका टेकमध्ये…”, शशांक केतकरचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाला “शूटींगच्या ठिकाणी…”
त्याच्या या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. “मला पास्ता खूप आवडतो, रेसिपी नक्की पाठवशील”, अशी कमेंट एका चाहतीने केली आहे. तर एकाने “शुभ सकाळ, शशांक मित्रा…. पौष्टिक न्याहरी” असे म्हटले आहे. तर अनेकांनी या व्हिडीओवर हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे.