मुंबईत दोन दिवसांपूर्वी १३ मेला अचानक वादळी वारे वाहू लागले. यामुळे घाटकोपर येथील पूर्व द्रुतगती मार्गावर लावलेला होर्डिंग कोसळला. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. घाटकोपरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेनंतर अभिनेता शशांक केतकरने संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर शशांकचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अभिनेता शशांक केतकरने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “आपल्या जिवाची किंमत नाही हेच खरं आहे. व्हिडीओ खूप मोठा आहे. कारण राग अनावर झालाय…आज आपण सुखरुप घरी पोहोचलो म्हणजे आपलं नशीब बलवत्तर असं म्हणायची वेळ आली आहे…”

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”

हेही वाचा – कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाच्या पोस्टरने वेधलं लक्ष, अभिनेत्याचा जबरदस्त लूक पाहून नेटकरी म्हणाले, “क्या बात है…”

व्हिडीओत शशांक म्हणाला, “मी माझ्या एका मित्राची वाट बघतं इथे एका रस्त्यात थांबलो आहे. गाडी पार्क केलेली आहे, म्हणून मी गाडीत बसून व्हिडीओ शूट करतोय. कुठल्याही नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केलेली नाहीये. हे स्पष्टीकरण देण्यामागचं इतकंच कारण की हा व्हिडीओ बघितल्यानंतर खूप जणांना असं होईल की, तूच नियम मोडतोस. कुठेही गाडी पार्क केलीये. तुलाच देशाची पर्वा नाही. तू अंध भक्त आहेस किंवा काँग्रेस विरोधक आहेस वगैरे बोलतील. पण नुकतंच मुंबईमध्ये एक वादळ आलं आणि त्या वादळामुळे काही घटना घडल्या. ज्या घटनेमध्ये घाटकोपरमध्ये जे काही घडलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. १२०*१२० फूट असं एक मोठच्या मोठं होर्डिंग एका पेट्रोल पंपावरती पडलं. दुर्दैवाने त्याचं वेळेस पाऊसही पडत होता. त्यामुळे काही जणांनी शेल्डर म्हणून त्याच्या खालीच थांबले होते. मग दुर्दैवाने त्यांच्या अंगावर ते होर्डिंग पडलं आणि जे कधीच घडू नये ते घडलं. आजचा मृतांचा आकडा १४ आहे. ते सगळं बघून मला कुठल्याच पक्षाला, कुठल्याचा राजकर्त्याला, कुठल्याच अधिकाऱ्याला काहीच म्हणायचं नाही. कारण तुमचा दोषच नाहीये. ही नैसर्गिक आपत्ती होती. त्यात आपल्या कोणाचा थेट हात नाहीये.”

पुढे अभिनेता म्हणाला, “पण घडलेल्या घटनेनंतर मला पुन्हा एकदा असं वाटलं आपल्या देशाची लोकसंख्याचं इतकी आहे की, आपल्या जिवाचा, आपल्या जगण्याला आपल्या देशामध्ये फार किंमत नाहीये. हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होतंय. जरूर आपल्या देशामध्ये विकास होतं आहे, वेगवेगळ्या पातळीवर आपण प्रगती करतो आहे. ज्याचं मला कौतुकचं आहे. अनेक गोष्टी आहे ज्या सुधारण गरजेचं आहे. पण हे काय आहे? १२०*१२० फूट एवढा मोठा एक बोर्ड वाऱ्याने पडतो. आता बातम्यांमध्ये येतंय की, तो बोर्डचं अनधिकृत होता. अर्थात एका पक्षाने दुसऱ्या पक्षावर आरोप करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या सरकारमध्ये त्या बोर्डाला परवानगी दिली होती. त्यांच्या सरकारमध्ये त्याची सगळी कागदपत्र झाली आणि मग तो बोर्ड तिथे लागला होता. मग नंतर काही बातम्यांमध्ये सांगितलं की, ४०*४० फूट बोर्ड लावायचीच मुंबईत परवानगी आहे. मग १२० फूटाचा बोर्ड तिथे कसा उभा राहतोय? आज तो पडला म्हणून तो अनधिकृत आहे या चर्चांणा उधाण आलेलं आहे. त्यामुळे तो कदाचित अनधिकृत असेलही. त्या बोर्डाचा मालक पळूनही गेलेला आहे. उद्या आणखी चार बोर्ड पडले तेही नंतर कळेल आपल्या की ते पण अनधिकृत होते.”

हेही वाचा – Video: ‘बजरंगी भाईजान’च्या मुन्नीने डान्स व्हिडीओमुळे ट्रोल करणाऱ्यांची बोलती केली बंद; हर्षाली मल्होत्रा ‘इतक्या’ टक्क्यांनी दहावी झाली पास

“मी एक ऐकलेली बातमी आहे, मी चुकीचा असेल तर मला सांगा. मुंबईतील कुठल्याही उड्डाणपुलावरती सीसीटीव्ही कॅमेरे नाहीयेत. इतका मोठा ब्लंडर कसा काय असू शकतो? एखाद्या पुलावर अपघात झाला तर तुम्ही तो कसा पाहणार? त्याला कायदेशीर मदत कशी घेणार? नेमकी कोणाची चूक? कोण बरोबर होतं? कोण कुठल्या लेनमध्ये होतं? अर्थात लेन पाळतच नाही आपण. कारण ड्रायव्हिंगबाबत आपण अशिक्षितचं आहोत. आपला देशही. पण तरी सुद्धा कोण कुठल्या लेनमध्ये होतं, कोण नेमकं कुठून आलं? हे कसं ठरावायच,” असं स्पष्ट शशांक म्हणाला.

“मी ठाण्यात राहतो. मला रोज मडला ठाण्यावरून जाताना घोडबंदर रोड घ्यावा लागतो. त्या घोडबंदर रोडला छानशी आता चौपाटी विकसित केली जातेय. जे खूप छान आहे. स्तुत्य आहे. लोकांनी तिकडे थांबून सगळा आस्वाद घ्यावा, खाणं खावं. तिथे प्यावं. बोटिंग करावं हे सगळं करावं. ती चौपटी विकसित करावी पण त्याच बरोबर आता झालेली आहे की नाही लोकसंख्या इतकी. तुम्हीच परदेशी कंपन्यांच्या गाड्या इकडे लोकांना चालवायला लावता. तिथे प्रमोट करता. लोकांनी गाड्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे वाहतूक वाढणाऱ्याचं आहे. मग रोडचं रुंदीकरण करण ही कोणाची जबाबदारी आहे? कोणाच्या हातात आहे? हे केव्हा करणार आहात तुम्ही? म्हणजे मी पुन्हा तेच सांगतोय कृपा करून कुठलीही महानगरपालिका, कुठलं सरकार याच्याMr मला काहीही घेणं-देणं नाहीये. कोणीही असो सत्तेत ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तो घोडबंदर रोड आहे, त्याची रुंदी वाढवायला पाहिजे. नाहीतर सतत गाड्या अडकतात. चुकीच्या मार्गाने बिनधास्त गाड्या चालवल्या जातात. त्या चुकीच्या मार्गाने येणाऱ्या गाड्यांमुळे माझ्या किंवा इतर कुठल्याही गाडीचा अपघात झाला तर त्या जीवांची जबाबदारी कुठली महानगरपालिका, कुठलं राज्य सरकार, कुठलं केंद्र सरकार जबाबदारी घेणार आहे? नुसते तुम्ही आमच्या आई-वडिलांना, नातेवाईकांना पैसे दिलेत म्हणजे जबाबदारी घेतली असं होत नाही. ते सगळे पैसे, तोच सगळा निधी रस्त्यांचं रुंदीकरणासाठी वापरा. लोकांना धडे शिकवायला, नियम शिकवायला त्या पैशांची गुंतवणूक करा,” असं शशांकने मत मांडलं.

हेही वाचा – “तथ्य नसलेल्या बातम्यांचा त्याला खूप त्रास व्हायचा”, मनोज बाजपेयींनी सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाले…

शशांकने त्याच्या व्हिडीओतून प्रत्येक मुद्द्यावर भाष्य केलं आहे. अनधिकृत होर्डिंगपासून ते कचऱ्याची समस्या, वाहतूक कोंडी समस्या या प्रत्येक मुद्द्यांवर अभिनेत्याने परखड मतं मांडली आहेत.

शशांक केतकरने या विषयावर भाष्य केल्यामुळे अनेक जण त्याच कौतुक करत आहेत. “प्रत्येक भारतीयाच्या मनातला तू बोललास”, “तू उपस्थित केलेला प्रत्येक मुद्दा योग्य आहे”, “अतिशय योग्य प्रकारे तू ते मांडलेले आहेस”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी शशांकच्या व्हिडीओवर दिल्या आहे.

Story img Loader