Lok Sabha Elections Results 2024: सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूक २०२४च्या निकालावर चर्चा सुरू आहे. ५४३ लोकसभा मतदार संघातील निकाल जाहीर झाले आहेत. भाजपाप्रणीत एनडीएने २९३ जागा जिंकल्या असून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने २३२ जागांवर विजय मिळवला आहे. ४०० पार जागा जिंकणार असा दावा करणाऱ्या भाजपाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत २०१९च्या तुलनेत कमी जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सध्या भाजपावर टीका केली जात आहे. बऱ्याच मराठी कलाकारांनी देखील भाजपाला टोला लगावला आहे. अशातच अभिनेता शशांक केतकरच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – “माझी प्रिय कंगना…”, बॉलीवूडची ‘क्वीन’ मंडीतून विजयी झाल्यावर अनुपम खेर यांची खास पोस्ट, म्हणाले…

ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
Image Of Ramdas Athawale
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा पक्षही दिल्लीच्या मैदानात, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले १५ उमेदवार
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला शशांक केतकर सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेत काम करत आहे. आपल्या अभिनयाबरोबर शशांक केतकर आपल्या परखड मतांमुळे चर्चेत असतो. राजकारणाविषयी अभिनेता नेहमी भाष्य करत असतो. नुकतंच त्याने लोकसभा निवडणूक २०२४च्या निकालासंदर्भात पोस्ट केली आहे.

हेही वाचा- “आपला बुलंद आवाज संसदेत पुन्हा…”, डॉ. अमोल कोल्हेंच्या विजयावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

अभिनेता शशांक केतकरने लोकसभा निवडणूक २०२४च्या निकालासंदर्भातील एक पोस्ट करत लिहिलं आहे, “कृपा करून आम्हाला जगायला सुरक्षित, प्रगत स्वच्छ आणि आनंदी देश द्या.” ही पोस्ट त्याने भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना टॅग केली आहे. शशांक केतकरी ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

हेही वाचा- रोहित शेट्टीबरोबर पंगा घेणं असिम रियाजला पडलं महाग, थेट ‘खतरों के खिलाडी १४’मधून केलं बाहेर, वाचा संपूर्ण प्रकरण

याशिवाय शशांकची पत्नी प्रियांका केतकरने देखील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केली होती.

हेही वाचा – कोणी लगावला भाजपाला टोला, तर कोणाचं चपखल भाष्य! लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मराठी कलाकारांच्या पोस्ट चर्चेत

दरम्यान, शशांक केतकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नाटक, मालिका, चित्रपटाच्या आणि वेब सीरिज या चार माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उटवला आहे. मराठीसह हिंदीत आता तो खूप सक्रिय झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे लागोपाठ हिंदी प्रोजेक्ट केले आहेत. ‘तेलगी स्कॅम २००३’, ‘शोटाइम’नंतर ‘गुनाह’ हा त्याचा नवा वेब शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या वेब शोमध्ये शशांकसह अभिनेता गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत झळकला आहे.

Story img Loader