Shashank Ketkar Home : मालिका आणि चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर नेहमी त्याच्या कामामुळे चर्चेत असतो. त्याने आजवर साकारलेल्या प्रत्येक विविधांगी भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. आता शशांक मराठीसह हिंदीत सिनेसृष्टीतही सक्रिय झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो हिंदीतील बऱ्याच प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच शशांकने सोशल मीडियावर आपल्या सुंदर घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्याच्या सुंदर घराच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून नेटकरी कौतुक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आनंदाच्या बागेत”, असं कॅप्शन लिहित शशांक केतकरने आपल्या सुंदर घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, शशांकच्या घरचा हॉल आणि झाड्यांनी सजलेली गॅलरी पाहायला मिळत आहे. हॉलमध्ये टीव्ही, टेबल, झाडं, फुलांचं कार्पेट, सोफा असं मोजक्या गोष्टी दिसत आहे. तर गॅलरीमध्ये विविध प्रकारची झाडं लावली आहेत. विशेष म्हणजे गॅलरीमध्ये असलेल्या तुळशी वृंदावनाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शशांकचं ( Shashank Ketkar ) हे सुंदर घर पाहून त्याच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shashank Ketkar Home

हेही वाचा – Bigg Boss OTT 3मध्ये ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडचा जलवा, पाहा जबरदस्त परफॉर्मन्सचे व्हिडीओ

शशांक केतकरचं घर पाहून नेटकरी काय म्हणाले?

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “खूप छान घरं…घराच्या आतील सजावट, बालकनीतील कुंड्यामधील फुलांची झाडं आणि सर्वात महत्वाचं खुपचं सुंदर तुळशी वृंदावनात लावलेला दिवा खूप छान शशांक-प्रियांका.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “व्वा मस्त किती सुंदर घर ठेवलं आहे आणि घराला साजेशा बगीचा, तुळशी वृंदावन तर खूप खूप छान…दिलेलं नाव आनंदाच्या बागेत अतिशय आवडलं.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “साधं सुंदर आणि शांत निवांत घर.”

हेही वाचा – Video: दारुच्या नशेत प्रसिद्ध गायकाचा टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये हंगामा, व्हिडीओ झाला व्हायरल

दरम्यान, शशांक केतकरच्या ( Shashank Ketkar ) कामाबद्दल बोलायचं झालं तर नाटक, मालिका, चित्रपटाच्या आणि वेब सीरिज या चार माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीसह हिंदीत आता तो खूप सक्रिय झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याने लागोपाठ हिंदी प्रोजेक्ट केले आहेत. ‘तेलगी स्कॅम २००३’, ‘शोटाइम’नंतर ‘गुनाह’ हा त्याचा नवा वेब शो अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या वेब शोमध्ये शशांकसह ( Shashank Ketkar ) अभिनेता गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत झळकला आहे. तसंच सध्या त्याच्या ‘मुरांबा’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor shashank ketkar share beautiful home video pps