अभिनेता शशांक केतकर हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. तो नेहमी सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या तो मुरांबा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकतंच शशांक केतकरने एक भावूक पोस्ट केली आहे.
स्टार प्रवाह मालिकेतील सर्वच मालिका या घराघरात लोकप्रिय आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळतात. या वाहिनीवरील मुरांबा ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत येणाऱे नवनवीन ट्विस्ट, रमा-अक्षयची खुलत जाणारी प्रेमकहाणी यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.
आणखी वाचा : “कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
नुकतंच अभिनेता शशांक केतकर या मालिकेतील सीनमधील एक फोटो शेअर केला आहे. त्यात तो या मालिकेतील अभिनेत्या प्रतिमा कुलकर्णी यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपल्याचे दिसत आहे. यात तो भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याला त्याने कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “बाबा तिथेच सतरंजी टाकून झोपतात कारण…” संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“मुरांबा मालिकेतला माझ्यासाठी हा सगळ्यात गोड क्षण होता प्रतिमा कुलकर्णी. ताई, आजी म्हणून तू डोक्यावरून फिरवलेला हात आशीर्वादापेक्षा काही कमी नाही. धन्यवाद स्टार प्रवाह या क्षणासाठी”, असे त्याने कॅप्शन या फोटोला दिले आहे.
शशांक केतकरच्या या पोस्टवर प्रतिमा कुलकर्णी यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुरांबा कुटुंबाला खूप खूप प्रेम, असे त्यांनी या कमेंटमध्ये म्हटले आहे. त्यांची ही कमेंट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तसेच शशांकची ही पोस्ट सध्या व्हायरलही होत आहे.