Maharashtra Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील २८८ विधानसभेच्या जागांवर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहेत. आज सकाळपासून मराठी कलाकार मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी, अभिजीत केळकर, मृण्मयी देशपांडे, तेजस्विनी पंडित, हेमंत ढोमे, जुई गडकरी, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर अशा सगळ्या मराठी कलाकारांनी मतदान केलं आहे. मतदान करून झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना देखील मतदान करण्याच आवाहन कलाकार मंडळी करत आहेत. अशातच अभिनेता शशांक केतकरच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शशांक केतकरने मतदान करून झाल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामधील फोटोवर अभिनेत्याने अधिकृत भारतीय जनतेचा जाहीरनामा लिहिला आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिलं आहे, “मी माझा हक्क बजावला आहे. अधिकृत भारतीय असल्याला मला अभिमान आहे. राजकारणाचा स्तर प्रचंड घसरला असला तरी उज्ज्वल भविष्याची आणि उत्तम हिंदुस्थानाची अपेक्षा आहे. मत देऊन असे गप्प बसू नका…चांगल्या कामाचं कौतुक करा आणि चुकांचा निषेध करा…इथून पुढे राज्यकर्त्यांचा नाही, तर आपला जनतेचा कॉमन मिनिमम प्रोग्राम, मॅनिफेस्टो ( COMMON MINIMUM PROGRAM , MANIFESTO ) असेल…पिढी बदलतं आहे, सजग होतं आहे… तुम्ही राजकारणाची पद्धत बदला.”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका का लांबवली? रुपाली भोसलेने सांगितलं यामागचं सत्य, म्हणाली, “आमचा विचार न करता…’

तसंच फोटोवर शशांक केतकरने लिहिलं की, अधिकृत भारतीय जनतेचा जाहीरनामा…राजकारण्यांसारखा प्रत्येकाकडे भरपूर पैसा, राजकारण्यांसारख्या प्रत्येकाकडे गाड्या, राजकारण्यांसारखी प्रत्येकाची मोठी घर…भारताची लोकसंख्या बघता शुद्ध हवा, शांतता, स्वच्छ परिसर, पाणी, खड्डे नसलेले मोठे रस्ते, शिक्षणाच्या उत्तम सोयी, उत्तम इस्पितळं, बागा, सुरक्षित समाज, शून्य भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समान हक्का, हाताला काम…२०२५ उजाडणार आहे. निदान या सामान्य गोष्टी तरी मिळू दे.

हेही वाचा – Bigg Boss 18: शिल्पा शिरोडकरला धाकट्या बहिणीने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, आहे दाक्षिणात्य सुपरस्टारची पत्नी

हेही वाचा – संजनाकडून काय घेऊन जाणार? अभिनेत्री रुपाली भोसले म्हणाली, “खऱ्या आयुष्यात…”

दरम्यान, अभिनेता शशांक केतकरची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. चाहत्यांनी शशांकच्या या मताला सहमती दर्शवली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor shashank ketkar shared the official indian people manifesto after voting for maharashtra election 2024 pps