‘कालाय तस्मै नम:’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमुळे अभिनेता शशांक केतकर घराघरांत लोकप्रिय झाला. मालिका, नाटक, चित्रपट व वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये शशांकने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सध्या शशांकने शेअर केलेल्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मुंबईतील मरिन ड्राइव्ह हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. अलीकडच्या काळात याठिकाणी अनेक जोडपी आपला वेळ घालवण्यासाठी येतात. याच मरिन ड्राइव्ह परिसरातील एक व्हायरल व्हिडीओ शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
शशांक केतकर हा व्हायरल व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहितो, “नेमकी पप्पी कोणाची घ्यायची हा गोंधळ होत नसेल का यांचा??” यापुढे अभिनेत्याने या पोस्टवर हसण्याचा इमोजी जोडला आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देत “सामाजिकेतचं जरा तरी भान राखलं पाहिजे” अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत.
दरम्यान, शशांक केतकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ या मालिकेत अक्षय ही मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ या सीरिजमध्ये शशांकने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या सीरिजचं संपूर्ण कथानक कथा अब्दुल करीम तेलगीने केलेल्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर आधारलेलं आहे.