‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. तो कायमच अनेक गोष्टींबद्दल त्याचे मत स्पष्टपणे मांडत असतो. नुकतंच शशांकने त्याच्या मालिका करण्यामागची कारणं सांगितली आहेत.

शशांक केतकरने नुकतंच ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला “तू मालिकांमध्ये रमतोस का?” याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने “रोजचं घर चालवण्यासाठी मी मालिका करतो”, असे उत्तर दिले.
आणखी वाचा : “प्रेक्षक ३०० रुपयात माझा चित्रपट का पाहतील?” शशांक केतकर स्पष्टच बोलला, म्हणाला “दाक्षिणात्य सिनेसृष्टीत…”

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण

‘मला मालिका करायला प्रचंड आवडतं. त्यामागे दोन तीन कारणं आहेत. मी माझ्या डोक्यात एक वर्गीकरण करुन घेतलं आहे. रोजचं घर चालवण्यासाठी मला मालिका करायच्या आहेत. माझा रियाज होत राहावा म्हणून मला नाटकं करायचं आहे आणि एक archive value व्हावी यासाठी मला चित्रपट करायचा आहे. असं मी वर्गीकरण केलं आहे. या तीनही गोष्टींमध्ये पैसा मिळतो”, असे शशांक म्हणाला.

“आपण स्वत: अनेक गोष्टींचा विचार करत असतो. मालिकांमधला चेहरा असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा मला भयंकर राग येतो. हा चित्रपटाचा चेहरा आहे, हे काय असतं. अभिनेता हा अभिनेता आहे. मी नाटक, चित्रपट, मालिका यात तिन्ही गोष्टींमध्ये काम केलं आहे. मालिका मी याआधीही केल्या आहेत, आता करतोय आणि यापुढेही करेन”, असेही शशांकने यावेळी सांगितले.

आणखी वाचा : Video : “गांधीजींची अहिंसा आणि मुस्लीम लांगूलचालन…” शरद पोंक्षेंच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, म्हणाले “मी सावरकरवादी…”

दरम्यान, सध्या शशांक ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत त्याने अक्षय मुकादम ही भूमिका साकारली आहे. त्यानंतर शशांक लवकरच एका चित्रपटातही झळकणार आहे.

Story img Loader