मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून शशांक केतकरला ओळखले जाते. शशांक केतकरची पत्नी प्रियांका केतकरच्या आजोबांचं निधन झालं आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका केतकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आजी-आजोबांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला तिने भावूक कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : शशांक केतकरच्या पत्नीला झाला आजार, पोस्ट शेअर करत म्हणाली, “हा लवकर…”

“माझी अशी इच्छा आहे की स्वर्गातही नातेवाईकांना भेटण्याचे काही तास असावेत. मी तिथे येईन, तुम्हा दोघांना घट्ट मिठी मारेन आणि आपण दररोज एकत्र गप्पा मारु, हसू आणि चर्चाही करु! आता तुम्ही दोघे पुन्हा एकत्र आला आहात. मस्त वेळ घालवा, तुमचे आवडते पदार्थ खा आणि तुमच्या आवडत्या मालिका एकत्र पाहा. आपण पुन्हा भेटेपर्यंत आजी आणि आजा”, असे प्रियांकाने म्हटले आहे.

यानंतर प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात तिने आजोबांचे निधन झालं असलं तरी कामातून कोणताही ब्रेक घेणार नसल्याचे तिने सांगितलं आहे.

“जेव्हा माझी आजी गेली तेव्हा माझे आजोबा मला म्हणाले होते की काम थांबवू नकोस. कारण आपलं आयुष्य कायमच पुढे जात राहायला हवं. आता माझे आजोबा आणि आजी स्वर्गात एकत्र राहत आहेत. त्यामुळे मी कामातून कोणताही ब्रेक घेणार नाही. मी अजून जास्त मेहनत करेन आणि त्यांना अभिमान वाटेल असं वागेन”, असे तिने म्हटले आहे.

आणखी वाचा : “सर्वांची नजर माझ्यावर” शशांक केतकरच्या ‘त्या’ फोटोवर पत्नीची कमेंट, म्हणाली “आणि तुझी…”

प्रियांका केतकर

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ची जादू कायम, चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी खर्च केलेले फक्त ‘इतके’ रुपये

दरम्यान प्रियांका केतकरने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिच्या आजोबांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर काहींनी हार्ट इमोजी शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor shashank ketkar wife priyanka grandfather died yesterday share emotional post nrp