‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. त्याचे असंख्य चाहते आहेत. सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्रींचाही त्याच्या चाहत्यांच्या यादीत समावेश होतो. शाहरुख खानला एकदा तरी भेटता यावे यासाठी त्याचे सर्वच चाहते प्रयत्न करत असतात. त्यातच आता अभिनेता शशांक केतकरची पत्नी प्रियांकाच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेता शशांक केतकर हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. २०१७ मध्ये शशांकने प्रियांका ढवळेसह लग्नगाठ बांधली. प्रियांका ही शशांकची मोठी चाहती आहे. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा : ‘गडकरी’चा ट्रेलर पाहिल्यावर देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत, म्हणाले “नितीन गडकरींचे आयुष्य एका भागात…”
या फोटोत प्रियांका ही खुर्चीत बसल्याचे दिसत आहे. तर शाहरुख खान हा तिच्या मागे उभं राहून तिचा मेकअप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा हा फोटो AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. “King Khan ला खरं कधी भेटेन माहित नाही, but निदान A.I. Made it virtually possible!”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
आणखी वाचा : शशांक केतकरच्या पत्नीला झाला आजार, पोस्ट शेअर करत म्हणाली, “हा लवकर…”
दरम्यान प्रियांकाच्या या फोटोवर असंख्य कमेंट्स पाहायला मिळत आहेत. “प्रियांका दिदी आपला शशांक दादाही शाहरुख खानपेक्षा कमी नाही”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “मी तुमचं कॅप्शन वाचलंच नाही आणि मला वाटलं की हा खरंच तुमच्या दोघांचा एकत्र फोटो आहे”, असे म्हटले आहे. तसेच एकाने “तुमचा नवरा पण शाहरुख पेक्षा कमी नाही. मराठी मुली मारायच्या त्याच्यावर त्या गाजलेल्या टीव्ही मालिकाच्या वेळी”, असे म्हटले आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.