काही दिवसांपूर्वी १२ जुलैला देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा शाही लग्नसोहळा पार पडला. अनंत अंबानीने हिंदू पद्धतीने राधिका मर्चंटशी लग्नगाठ बांधली. या शाही लग्नसोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज मंडळींनी खास उपस्थिती लावली होती. मराठी कलाकारांना देखील अनंत अंबानीच्या लग्नाचं निमंत्रण मिळालं होतं. अभिनेत्री अमृता खानविलकर, गिरीजा ओक, सावनी रविंद्र अशा काही मराठी कलाकारांना अनंत-राधिका लग्नाचं निमंत्रण दिलं होतं. यामध्ये अभिनेता श्रेयस राजे ( Shreyas Raje ) देखील सामील होता. त्याने अनंत-राधिकाच्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटो शेअर करून अंबानींच्या मॅनेजमेंटचं कौतुक केलं होतं. आता हाच श्रेयस राजे लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या ‘चारचौघी’ नाटकात अभिनेता श्रेयस राजे ( Shreyas Raje ) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आता श्रेयसची ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत जबरदस्त एन्ट्री झाली आहे. याचा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मास घालून श्रेयसची एन्ट्री दाखवण्यात आली आहे.

हेही वाचा – Video: शशांक केतकरचं सुंदर घर पाहिलंत का? नेटकरी करतायत कौतुक, पाहा व्हिडीओ

श्रेयसने ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेचा प्रोमो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत श्रेयसने लिहिलं आहे, “खूप दिवसांनी पुन्हा एकदा सोनी मराठी वर…बघायला विसरू नका ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिका.”

हेही वाचा – Bigg Boss OTT 3मध्ये ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडचा जलवा, पाहा जबरदस्त परफॉर्मन्सचे व्हिडीओ

अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका पाहून श्रेयस काय म्हणाला होता?

दरम्यान, श्रेयसने ( Shreyas Raje ) अनंत-राधिकाच्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटो शेअर करत लिहिलं होतं, “तर ही दस्तूरखुद्द मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे. ही पत्रिका माझ्यापर्यंत पोहोचावी म्हणून अंबानी मॅनेजमेंटकडून एक अख्खा माणूस अपॉइंट केला होता. जो वांद्र्याहून घोडबंदरपर्यंत फक्त ही पत्रिका द्यायला आला. क्रेझी मॅनेजमेंट.”

हेही वाचा – Video: दारुच्या नशेत प्रसिद्ध गायकाचा टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये हंगामा, व्हिडीओ झाला व्हायरल

श्रेयस राजेच्या ( Shreyas Raje ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने बऱ्याच एकांकिका, नाटक, मालिका, वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘जिगरबाज’, ‘भेटी लागी जीवा’, ‘ती परत आलीये’ या मालिकांमध्ये श्रेयसने विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. सध्या तो चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ नाटकात काम करत आहे. या नाटकात श्रेयसबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, पार्थ केतकर महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor shreyas raje entry in abol priteechi ajab kahani serial pps