मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी निर्माण करणारा अभिनेता म्हणून श्रेयस तळपदेला ओळखले जाते. श्रेयस तळपदे हा सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत यशची भूमिका साकारत आहे. या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. श्रेयस तळपदे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच श्रेयस तळपदेने त्याचं नाव असलेल्या फेक अकाऊंटबद्दलचा खुलासा केला आहे. त्याने एक ट्वीट करत चाहत्यांना याबद्दल सतर्क केले आहे.
श्रेयस तळपदेने नुकतंच ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना फेक अकाऊंटपासून सावध राहण्याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत. सध्या ट्विटरवर श्रेयस तळपदे या नावाने दोन अकाऊंट आहेत. ही दोन्हीही अकाऊंट व्हॅरिफाईड आहेत. यातील एक अकाऊंट अभिनेता श्रेयस तळपदेचे आहे. तर दुसरे अकाऊंट हे फेक आहे.
आणखी वाचा : झुकेगा नही साला…!, अभिनेता श्रेयस तळपदे करणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री
नुकतंच श्रेयस तळपदेच्या फेक अकाऊंटवरुन सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्याबद्दल एक ट्वीट करण्यात आलं होतं. या ट्वीटला रिट्विट करत श्रेयसने चाहत्यांना एक आवाहन केले आहे.
“प्रिय मंडळी, सर्वांनी कृपया लक्ष द्या, हे ट्वीट माझ्या ऑफिशिअल अकाऊंटवरुन करण्यात आलेले नाही. माझ्या अधिकृत ट्वीटर हँडलचे नाव ‘श्रेयस तळपदे १’ असे आहे. हा व्यक्ती माझ्या नावाचा वापर करुन चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल रिपोर्ट करा, जेणेकरुन त्याचे ट्वीटर अकाऊंट बंद होऊ शकेल.
सध्या ट्विटरवर ‘श्रेयस तळपदे’ या नावाने असलेले अकाऊंट व्हेरिफाईड आहे. त्या व्यक्तीने माझे नाव आणि माझे फोटो वापरले आहेत. मला त्याच अकाऊंटशी काहीही घेणेदेणे नाही. परंतु तो किंवा ती व्यक्ती माझ्या नावाचा वापर करत चुकीची माहिती पसरवत आहेत”, असे आवाहन श्रेयस तळपदेने म्हटले आहे.
आणखी वाचा : “अमेय वाघ माझ्या खोलीत गेला अन्…” सोनाली कुलकर्णीने सांगितला ‘तो’ किस्सा
दरम्यान श्रेयस तळपदे हा सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत झळकत आहे. यात तो यश हे पात्र साकारताना दिसत आहे. हे पात्र घराघरात लोकप्रिय झाले आहे. त्याबरोबर त्याचा आपडी थापडी या चित्रपटातही झळकला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.