अभिनेत्री श्वेता शिंदेची निर्मिती असलेली ‘लाखात एक आमचा दादा’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचे नवनवीन जबरदस्त प्रोमो प्रदर्शित होत आहेत. या मालिकेतून ‘लागिरं झालं जी’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता नितीश चव्हाण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमधली उत्सुकता वाढली आहे. या नव्या मालिकेत झळकणाऱ्या बऱ्याच कलाकारांची नावं समोर आली आहेत. आता आणखी एक नावं समोर आलं आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत ‘झी मराठी’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण सूर्यादादाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. एक भाऊ आणि चार बहिणी यांच्या भोवती फिरणारी या नव्या मालिकेची कथा आहे. अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समुद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) या चारजणी बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहे. ८ जुलैपासून रात्री साडे आठ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे.

हेही वाचा – “आयुष्यातला सर्वात मोठा घोटाळा..”, पूजा भट्टबरोबर झालेल्या ब्रेकअपविषयी पहिल्यांदाच रणवीर शौरीने सोडलं मौन!, म्हणाला…

नितीश चव्हाण याच्या नव्या मालिकेत ‘झी मराठी’वरील जुनी लोकप्रिय मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’मधील कलाकार पाहायला मिळणार आहे. अभिनेता शुभम पाटील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. यासंदर्भातील पोस्ट त्यानं स्वतः सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

हेही वाचा – ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वातून अचानक ‘हा’ स्पर्धक बेघर, आतापर्यंत कोणते स्पर्धक एलिमिनेट झाले? वाचा

हेही वाचा – दागिने, किराणा सामान अन् ‘इतक्या’ लाखांचा चेक…; अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाह सोहळ्यात ५० गरीब जोडप्यांना काय-काय दिलं? जाणून घ्या…

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत ‘लागिरं झालं जी’मधील आणखी एक अभिनेता दिसणार आहे. ‘लागिरं झालं जी’मध्ये ‘टॅलेंट’ म्हणून झळकलेला अभिनेता महेश जाधव नव्या मालिकेतून नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय अभिनेत्री दिशा परदेशी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor shubham patil play role in new serial lakhat ek amcha dada pps