मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांना ओळखले जाते. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सिद्धार्थ चांदेकरची पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही सध्या एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. त्यातच आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने शेअर केलेल्या फोटोने लक्ष वेधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. त्याचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. त्याने सोशल मीडियावर नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थ हा वेंगुर्ल्यात फिरण्यासाठी गेल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “हे फोटो टाकणं…” पत्नीने अंघोळ करताना शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर सिद्धार्थ चांदेकरची कमेंट

यावेळी सिद्धार्थने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. त्याबरोबर त्याने काळ्या रंगाचा गॉगलही घातला आहे. सिद्धार्थने या फोटोला “Baby calm down” असे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा : Photos : मिताली मयेकरचा अंघोळ करतानाचा ‘तो’ फोटो पाहून नेटकरी संतापले, म्हणाले “मनावरचा ताबा…” 

तर दुसरीकडे सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मिताली ही मध्यप्रदेशात फिरण्यासाठी गेली आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिचा अंघोळ करतानाचा पाठमोरा फोटो शेअर केला होता. याला तिने ‘अपवित्र’ असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला अंघोळ करतानाचा बोल्ड फोटो, कॅप्शन चर्चेत

तिच्या या फोटोवर तिचा पती सिद्धार्थ चांदेकरनेही मराठीत कमेंट केली आहे. “काय पण हे फोटोस टाकणं. मी एवढ्या लांब असताना”, असे त्याने या फोटोवर कमेंट करत म्हटले आहे. त्यावर मितालीनेही प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धार्थने केलेल्या या कमेंटवर मितालीने “इशारा समज आणि परत ये” अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या या संभाषणाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth chandekar share photos with interesting caption after wife mitali mayekar post nrp