मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर या दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल्या आहेत. सिद्धार्थने एक फोटो शेअर करत चाहत्यांना याबद्दलची गुडन्यूज दिली आहे. त्यानंतर आता सिद्धार्थने आईच्या दुसऱ्या लग्न करण्यामागचे कारण सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे काही फोटो नुकतंच समोर आले. सिद्धार्थने याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. “Happy Second Innings आई! तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं !”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
आणखी वाचा : “आता मी तुझं लग्न लावतोय…”, सिद्धार्थ चांदेकरची आई पुन्हा विवाहबंधनात, फोटो आला समोर

त्यानंतर आता सिद्धार्थ चांदेकरने ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना आईच्या दुसऱ्या लग्नामागची कहाणी सांगितली आहे. यावेळी सिद्धार्थ म्हणाला, “आईनं तिचं आयुष्य आम्हा दोघा भावंडांसाठी खर्ची केलं. पण आता आमचं सर्व मार्गी लागल्यावर तिच्या आयुष्यात एकटेपणा अधिक भासू लागला. तेव्हा तिला एका जोडीदाराची गरज आहे असं आम्हाला जाणवलं.”

“मी आणि माझ्या बहिणीनं तिला कितीही वेळ दिला तरी तो कमीच पडणारा आहे. अशावेळी आम्ही आईची समजूत घातली आणि तिला समजून घेत या निर्णयासाठी तयार केलं.

आणखी वाचा : Video : “आम्हाला उत आलाय का?” जितेंद्र जोशीचा अवधूत गुप्तेला प्रश्न, भर कार्यक्रमात म्हणाला “ही खुर्ची…”

आमचं संपूर्ण कुटुंब, मुलं तिच्या पाठीशी असलो तरी आम्ही प्रत्येक क्षणी तिच्याबरोबर नसू, त्यासाठी जोडीदारच हवा. जो प्रत्येक क्षणी तिला साथ देईल. हा विचार करून आम्ही आईचं दुसरं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांतच नितीन काकांचं स्थळ सांगून आलं”, असेही सिद्धार्थ चांदेकरने म्हटले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth chandekar talk about why her mother get marry second time know the reason behind it nrp